शरद कुमार यांनी हायटेक पोल्ट्री फार्मिंग मधून मिळवले मोठे यश! पोल्ट्री फार्मिंग मधून वर्षाला मिळवतात 20 लाखांपेक्षा जास्त नफा

उत्तर प्रदेश राज्यातील बीजनौर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी शरद कुमार सिंह यांची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर तरुण शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांची घरची चाळीस एकर जमीन असून या जमिनीमध्ये विविधता जपत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन तर मिळवले आहे. परंतु हायटेक पोल्ट्री फार्मिंग व्यवसायामध्ये शिरून देखील त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Published on -

Poultry Farming:- शेती व्यवसाय आता काळानुरूप खूप मोठ्या प्रमाणावर बदलत असून यामध्ये आता नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात असल्याने शेती मधून मोठ्या प्रमाणावर शेतकरी उत्पन्न घेताना आपल्याला दिसून येत आहेत.

तसेच बरेच शेतकरी हे बाजारपेठेतील मागणी व बदलती परिस्थिती या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन शेतीमध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न करत असून त्या माध्यमातून शेतीचे नियोजन केले जात असल्याने उत्पादन देखील भरघोस मिळत आहे.

तसेच शेतीच्या संबंधित असलेल्या जोडधंद्यांमध्ये देखील आता शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रवेश केला असून पशुपालन आणि पोल्ट्री फार्मिंग सारख्या व्यवसायांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करत आज अनेक शेतकऱ्यांनी यशाचे शिखर गाठल्याचे आपल्याला दिसून येते.

यामध्ये जर आपण उत्तर प्रदेश राज्यातील बीजनौर जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी शरद कुमार सिंह यांची यशोगाथा बघितली तर ती नक्कीच इतर तरुण शेतकऱ्यांना प्रेरणादायी आहे. त्यांची घरची चाळीस एकर जमीन असून या जमिनीमध्ये विविधता जपत त्यांनी मोठ्या प्रमाणावर उत्पादन तर मिळवले आहे. परंतु हायटेक पोल्ट्री फार्मिंग व्यवसायामध्ये शिरून देखील त्यांनी एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

अशाप्रकारे केली त्यांनी पोल्ट्री फार्मिंग व्यवसायाला सुरुवात?
शरद कुमार यांनी साधारणपणे 18 वर्षांपूर्वी कुक्कुटपालन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले होते. तेव्हापासून ते अगदी संघटित आणि तांत्रिक पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करत होते.

पोल्ट्री व्यवसाय सुरू करण्या अगोदर त्यांनी उत्तर प्रदेश राज्यातील बरेली आणि इज्जतनगर येथून पोल्ट्री फार्मिंगचे ट्रेनिंग घेतले व त्यानंतर ब्रॉयलर कोंबड्यांचे पालन सुरू केले. ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय करतात. या प्रकारच्या पोल्ट्री फार्मिंगमध्ये कंपनी पिल्लांना लागणारे खाद्य तसेच पिल्ले,

लसीकरण आणि इतर तांत्रिक सल्ला पुरवते. या पद्धतीत शेतकऱ्याचे काम फक्त शेड आणि कोंबड्यांची काळजी घेणे इतकेच असते. पोल्ट्री फार्मिंगचे हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीचे मॉडेल शेतकऱ्यांसाठी सोयीस्करच नाही तर आर्थिक स्थिरता देणारे देखील आहे.

कशी आहे त्यांच्या पोल्ट्री फार्मची रचना आणि व्यवस्थापन?
त्यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 12000 कोंबड्या मावतील इतकी शेडची क्षमता आहे. त्यांनी हायटेक पोल्ट्री फार्म बनवला असून ज्यामध्ये प्रत्येक कोंबडीला सुमारे एक स्क्वेअर फुट जागा मिळते. पूर्व पश्चिम अशा दिशेला त्यांनी शेड उभारले असून यामुळे सूर्याची तीव्र किरणे थेट शेडमध्ये जात नाहीत व त्याचवेळी व्हेंटिलेशन देखील चांगल्या प्रकारे होते.

शेडची अशा प्रकारची रचना कोंबड्यांच्या आरोग्यासाठी खूप पोषक आहे व नैसर्गिक रोगांपासून देखील त्यांचे संरक्षण करते. त्यांनी जवळपास 40 लाख रुपये किमतीचे शेड उभारले आहे.

कॉन्ट्रॅक्ट पोल्ट्री फार्मिंगचे मॉडेल आणि मिळणारे उत्पन्न
शरद कुमार यांचे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मॉडेल खूप यशस्वी ठरले आहे. यामध्ये कोंबडीचे वजन दोन किलो झाल्यानंतर कंपनी त्या कोंबड्या स्वतःच्या ताब्यात घेते. या प्रक्रियेला सुमारे 40 दिवस लागतात. या बदल्यात शरद कुमार यांना 9 ते 14 रुपये प्रतिकिलो दराने मोबदला दिला जातो.

एक कोंबडी तिच्या चाळीस दिवसाच्या आयुष्यामध्ये साधारणपणे दोन किलो फीड खाते. ते हंगामानुसार दिले जाते. ते साधारणपणे वर्षातून सहा बॅचेस घेतात व त्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न या माध्यमातून मिळत आहे. पोल्ट्री फार्मिंग चा कॉन्ट्रॅक्ट मॉडेलचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये बाजारात कोंबड्यांच्या विक्रीची चिंता शरद कुमार यांना करावी लागत नाही.

तसेच कंपनीकडूनच लसीकरण आणि खाद्याची गुणवत्ता सुनिश्चित केली जाते व त्यामुळे कोंबड्या आजारी देखील पडत नाहीत व त्यांची वाढ खुंटली जात नाही. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होतो आणि नफ्याचे प्रमाण वाढते.

किती मिळते त्यांना वार्षिक उत्पन्न आणि काय आहेत भविष्यातील योजना?
शरद कुमार सिंह यांचे पोल्ट्री फार्मिंगचे वार्षिक उत्पन्न 20 लाखापेक्षा जास्त आहे. येणाऱ्या काळामध्ये ते कुक्कुटपालन व्यवसायाचा आणखी विस्तार करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाहीतर शरद कुमार पोल्ट्री फार्मिंग हा व्यवसाय फायदेशीर कसा करता येईल याबद्दल त्यांच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe