युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :-  युवा कार्यकर्ते हीच पक्षाची खरी शक्ती आहे. युवकांनीच नगर जिल्ह्यात बदल घडवला असून, राष्ट्रवादीच्या युवा आमदारांना निवडून दिले.

राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी जिल्ह्यात सक्रीय असून विविध प्रश्‍न सोडविण्यास पुढाकार घेत आहे. युवकांनी अधिक सक्षमपणे राष्ट्रवादी पक्षाचे संघटन वाढवण्याची गरज आहे. राष्ट्रवादीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते कामाला लागले असून,

येणार्‍या काळात राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकार्‍यांनी काम न केल्यास वेगळा विचार करावा लागणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक किशोर मासाळ यांनी दिला. अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना युवकचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक मासाळ बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, कार्याध्यक्ष संजय कोळगे, किसनराव लोटके, काकासाहेब तापकिर, रोहन साबळे, चंद्रकांत मरकड

, शरद शिंदे, नरेंद्र जाधव, नितीन धांडे, ऋषीकेश गायकवाड, विक्रम कळमकर, मनोज भालसिंग, निलेश गोडसे, संतोष पवार, रवी माळुंजकर, संदीप सोनवणे, चारुदत्त शिंगर, नवाझ कुरेशी आदिंसह युवकचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

फिजीकल डिस्टन्स व सर्व नियम पाळून सदर बैठक घेण्यात आली. या बैठकित युवक पदाधिकार्‍यांनी विविध सूचना मांडल्या. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, राष्ट्रवादीत युवकांना संधी दिली जात असून,

त्यांच्या कार्याचा सन्मान देखील केला जात आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी आनखी बळकट करण्यासाठी युवकांना अंगझटकून काम करावे लागणार आहे. युवक पक्षाशी जोडला गेल्यास संपुर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय होणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment