Ahilyanagar News:- अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी वेगात प्रचार सुरू केला असून अनेक घटकांच्या माध्यमातून त्यांना या निवडणुकीत पाठिंबा मिळताना दिसून येत आहे. सध्या त्यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर व त्यांच्याशी संवाद साधण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला असून याप्रकारे त्यांनी प्रचारात वेग घेतल्याचे चित्र आहे.
या सगळ्या प्रचारादरम्यान जर आपण बघितले तर अनेक जणांचा पाठिंबा त्यांना मिळत आहे. याचाच भाग म्हणून आमदार जगताप यांनी शुक्रवारी केडगाव उपनगरात प्रचार फेरी काढली व नागरिकांच्या संवाद साधला.
केडगाव मधून आमदार संग्राम जगताप यांना मोठे मताधिक्य देणार- माजी नगरसेवक सुनील कोतकर यांचे प्रतिपादन
गेल्या अनेक वर्षापासून आमदार संग्राम जगताप हे केडगावच्या विकासाकरिता योगदान देत असून कायम नागरिकांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात. त्यामुळे आम्ही पण दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना मताधिक्य देऊन त्यांनी केलेल्या कामांची परतफेड करत आहोत.
अगदी त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीत देखील केडगाव मधून मोठे मताधिक्य देऊन त्यांच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणार असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक सुनील कोतकर यांनी केले. शुक्रवारी महायुतीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केडगाव उपनगरात प्रचार फेरी काढलेली होती व त्यादरम्यान त्यांनी नागरिकांशी देखील संवाद साधला.
यावेळी केडगाव वेशी जवळ आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत देखील करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोज कोतकर तसेच महेंद्र कांबळे, गणेश ननावरे, राहुल कांबळे इत्यादीसह अनेक नागरिक व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी काय म्हणाले आमदार संग्राम जगताप?
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले की,केडगाव भागात झालेल्या विकास कामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला असून त्यामुळे मला या भागातून नागरिकांचे मोठे समर्थन मिळत आहे.
तसेच यावेळी बोलताना माजी नगरसेवक मनोज कोतकर यांनी म्हटले की,आमदार संग्राम जगताप यांनी अनेक वर्षापासून रखडलेल्या अंबिका नगर ते शाहूनगर रस्त्याचे काम पूर्ण केले व लिंक रोड ते झेंडा चौक रस्त्याचे काम पूर्णत्वास आहे. त्यासोबतच भूषण नगर ते कल्याण रोड या प्रमुख रस्त्यांच्या कामासह सर्व अंतर्गत रस्त्यांची कामे त्यांनी मार्गी लावलेली आहेत.