मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या पत्रावरून थोरातांनी राज्यपालांना विचारला हा प्रश्न

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासंदर्भात लिहिलेल्या पत्रावरून वाद सुरू झाला आहे.

या पत्राच्या भाषेबाबबत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करत पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवले होते. तर आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील राज्यपालांच्या या कृतीवर आपले मत व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी थेट राज्यपालांच सवाल केला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपाल पदाचा पदभार असून, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?,’ असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला आहे.

त्याचबरोबर राज्यपालांच्या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का, असंही थोरात यांनी म्हटलं आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रावरून बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली, तर मंदिरं बंद का? अशी विचारणी केली आहे.

राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?,’ असा सवाल थोरात यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान राज्यपालांच्या अशा भाषेबद्दल शिवसेना आणि कॉंग्रेसने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.

त्याचवेळी, शिवसेना या संदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची विनंती करू शकते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment