खुशखबर! भारतात लॉन्च झाली सर्वात स्वस्त Audi Q8 कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,14 ऑक्टोबर 2020 :- वाहनधारकांसाठी एक खुशखबर आली आहे. बहुचर्चित Audi Q8 भारतात लाँच झाली आहे. या कारचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ही भारतात लाँच होणारी आतापर्यंतची सर्वात स्वस्त कार आहे.

ऑडीचे सर्वात स्वस्त मॉडल असण्यासोबतच ही क्यू सीरीजची सर्वात छोटी कार आहे. फेस्टिवल सीजनला डोळ्यासमोर ठेवून कंपनीने भारतात या कारला लाँच करण्याचे ठरवले होते.

याआधी कंपनीने या वर्षी भारतात 04 मॉडल लाँच केलेले आहेत. म्हणजेच ही कार भारतातील पाचवी कार आहे. सर्वात स्वस्त Audi Q8 Celebration Edition आज लॉन्च करण्यात आली आहे.

आज आम्ही तुम्हाला याच कारच्या फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत बद्दल सांगणार आहोत. जाणून घ्या गाडीचे काही फीचर्स Audi Q8 Celebration Edition मध्ये 3.0 लिटरचे TFSI पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

जे 335 bhp ची पॉवर आणि 500 Nm चा टॉर्क जनरते करते. ही कार 5.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास गती प्राप्त करते. याची टॉप स्पीड 250 किमी प्रतितास आहे.

Audi Q8 Celebration edition यामध्ये एलईडी हेडलॅम्प्स, हॅप्टिप रिस्पॉन्ससह ड्युअल टचस्क्रीन, एमएमआय नेव्हिगेशन, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट, ऑडी स्मार्टफोन इंटरफेस आणि ऑडी प्री-सेन्स सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

जाणून घ्या किंमत Audi Q8 Celebration Edition ची एक्स-शोरूम किंमत 98.98 लाख रुपयाची आहे. ही किंमत Audi Q8 च्या स्टॅंडर्ड व्हेरिएंटपेक्षा 34 लाख रुपये स्वस्त आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment