शुभम भाऊने एमबीए केले पण नोकरीच्या मागे न लागता घेतला शेती करण्याचा ध्यास! ऊस लागवडीत गाठला 110 टन उत्पादनाचा टप्पा, कसे केले शक्य?

कृषी क्षेत्रामध्ये देखील आता अनेक उच्च शिक्षित तरुण करिअरच्या दृष्टिकोनातून पदार्पण करत आहेत व शेतीचा पार चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत. शेतीमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करत या तरुणांनी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत व तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य देखील करून दाखवले आहेत.

Published on -

Farmer Success Story:- आजची तरुण पिढी पाहिली तर ती कायमच वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये कुशल असल्याचे आपल्याला दिसून येते किंवा वेगवेगळे प्रयोग करण्याचा गुण बऱ्याच तरुणांमध्ये आपल्याला दिसून येतो. आजकालचे बरेच तरुण उच्चशिक्षित असल्यामुळे ते कोणत्याही क्षेत्रामध्ये जातात त्या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलायला वेळ लागत नाही हे तितके सत्य आहे व याला कृषीक्षेत्र देखील अपवाद नाही.

कृषी क्षेत्रामध्ये देखील आता अनेक उच्च शिक्षित तरुण करिअरच्या दृष्टिकोनातून पदार्पण करत आहेत व शेतीचा पार चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे प्रयत्न हे वाखाणण्याजोगे आहेत. शेतीमध्ये विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करत या तरुणांनी शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेले आहेत व तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक अशक्य गोष्टी शक्य देखील करून दाखवले आहेत.

अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण 22 फाटा( केडगाव ) येथील एमबीए पूर्ण केलेल्या उच्चशिक्षित असलेल्या शुभम बारवकर या तरुणाची यशोगाथा पाहिली तर नक्कीच ती इतर तरुणांना प्रेरणादायी ठरेल असेच आहे.

या तरुणाने रोपवाटिका तंत्रज्ञानाचा वापर करत उसाचे तब्बल ११० टन एवढे विक्रमी उत्पादन मिळवण्यामध्ये यश मिळवले आहे.विशेष म्हणजे या ऊस शेतीमध्ये मजुरांवर अवलंबून न राहता सगळ्या कामांमध्ये घरच्या सदस्यांनी लक्ष दिल्याने सगळी कामं वेळेत पूर्ण करता आली व व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून व्यवस्थित लक्ष राहिल्याने हे विक्रमी उत्पादन त्यांना मिळाले आहे.

अशा पद्धतीने केले ऊस लागवडीचे नियोजन
ऊस लागवड करण्याचे निश्चित केल्यानंतर शुभम बारवकर यांने ऊस लागवडीची जी काही पारंपारिक पद्धत आहे ती न वापरता 14 महिन्या अगोदर उसाच्या रोपांची निर्मिती घरीच केली. अत्याधुनिक अशा रोपवाटिका तंत्रज्ञानाचा वापर करून अल्पावधीत उसाची वाढ उत्तम दर्जाची व्हायला यामुळे मोठी मदत झाली.

त्याने उसाच्या 86032 या वाणाचे उसाचे बेणे घरच्या घरी तयार केले. यामध्ये एक डोळा कटरच्या मदतीने सरळ असणारे ऊस कट केले. त्यानंतर कोकोपीट प्लास्टिक ट्रे मध्ये भरून त्यामध्ये कट केलेली उसाचे डोळे लावले. तसेच बाविस्टीन व कॅनोन आणि इतर महत्वाचे पोषक घटक असलेल्या खतांच्या माध्यमातून दर्जेदार उगवण क्षमता असलेल्या रोपांची निर्मिती त्या माध्यमातून केली.

जेव्हा उसाच्या रोपांची वाढ चांगली झाली आहे असे पाहून रोपांची लागवड शेतामध्ये केली. महत्वाचे म्हणजे उसाची रोपे तयार करण्यासाठी ज्या काही बेण्याचा वापर करण्यात आला ती प्रजाती स्वतःच्या शेतामधील असल्यामुळे शुभमला उगवण क्षमतेबाबत पक्की शाश्वती होती.

जेव्हा उसाची लागवड करायचे ठरवले तेव्हा ती लागवड करताना फक्त एकावेळी मोकळे पाणी दिले व त्यानंतर ड्रीपच्या मदतीने पाणी व्यवस्थापन केले. मशागती करिता ट्रॅक्टरचा वापर केला व आधुनिक उपकरणांच्या साह्याने व्यवस्थितपणे ऊस शेतीची नियोजन केले.

शुभम यांच्या शेतीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे सर्व कुटुंबातील लोक हे शेतीमध्ये काम करतात. त्यामुळे मजुर वेळेवर न मिळणे किंवा मजुरांमुळे कामाला विलंब होणे या समस्या त्यांना उद्भवत नाहीत व वेळच्यावेळी ऊस शेतीचे कामे पूर्ण करणे त्यांना शक्य होते.

खत व्यवस्थापन करताना उसाला त्यांनी तीन वेळा ड्रिचिंग केले तसेच चार वेळा फवारणी व तीन खतांचे डोस दिले. ड्रीपरच्या माध्यमातून पाण्यात विरघळणाऱ्या महत्त्वाच्या खतांचा वापर त्याने उसासाठी केला व जेव्हा उसाची वाढ व्हायला लागली तेव्हा फुटव्यांची संख्या किती ठेवावी याबाबत व्यवस्थित नियोजन केले.

ऊस पिकाच्या बाबतीत जर बघितले तर जे फुटवे पाच महिन्यानंतर येतात ते अनावश्यक समजले जातात व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वाचे काम शुभम यांनी केले. साधारणपणे एका उसाच्या बेटामध्ये नऊ ते दहा उसाची संख्या नियंत्रित केली.

अशा पद्धतीने योग्य व्यवस्थापन केल्यामुळे 14 महिन्यामध्ये पंधरा फुटा पेक्षा उसाची जास्त वाढ झाली व 35 ते 36 कांडी असलेल्या उसाचे उत्पादन मिळाले. अशा पद्धतीने योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर करत शुभम यांनी उसाचे 110 टन एवढे विक्रमी उत्पादन घेण्यापर्यंत मजल मारली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe