शेवगाव :- तालुक्यातील मुरमी येथे पावसात अंगावर वीज पडल्याने एका वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव साहेबराव गरड (वय ७०), असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ही घटना गुरुवारी रोजी रात्री नऊ वा. घडली.
तर याच दिवशी सामनगाव येथे पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून एक गाय दगावली. शुक्रवारी देवराव गरड हे घराच्या पडवीत झोपले होते. रात्री साडेनऊच्यादरम्यान पाऊस सुरू झाला, या वेळी वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

तसेच घराची भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले. गरड यांच्यामागे अंध पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे, असा परिवार आहे. प्रा. शिक्षक बॅंकेचे माजी संचालक विनोद फलके यांचे ते चुलत सासरे होते. सामनगाव येथे जोरदार पावसामुळे गंगाधर म्हस्के यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून गाय दबली.
म्हस्के यांचे चिरंजीव मेजर अनिल म्हस्के, रुपेश म्हस्के व ग्रामस्थांनी गायीवर पडलेली भिंत बाजूला सारली. मात्र, गाय दगावली. दोन्ही घटनांचा तलाठी महानंदा काशिद यांनी केला आहे. दरम्यान, आमदार मोनिका राजळे यांनी व जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांनी स्वतंत्रपणे मयत गरड यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.
- अहिल्यानगरमध्ये उष्णतेचा कहर, तापमान पुन्हा ४३ अंशांवर, पुढील ५ दिवस उकाडा कायम
- Sangamner News : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांमधून पाणी
- Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना मोठा धक्का! आता उत्पन्नावरून मिळणार हप्त्याचा लाभ? सरकारची नवी कारवाई
- शिर्डी विमानतळाचे होणार विस्तारीकरण: कुंभमेळ्यासाठी दोन हेलिपॅड, आठ वाहनतळांना मुख्यमंत्र्यांची मान्यता
- पक्षातून हकालपट्टी केलेल्या लोकांनीच बॅनरबाजी केली, त्यांना आम्ही महत्व देत नाही; विखे पाटलांनी घेतला समाचार