सरकारी योजनेतून 90% टक्क्यांपर्यंत कर्ज घ्या व ‘हा’ व्यवसाय सुरू करा! महिन्याला कराल लाखोत कमाई आणि आयुष्यभर हातात खेळत राहील पैसा

तुम्हाला देखील जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर या लेखात ज्या व्यवसायाची माहिती दिली आहे तो व्यवसाय सुरू करू शकतात व यामध्ये तुम्हाला सरकारी योजनेतून 90% पर्यंत कर्जदेखील मिळू शकते व तुम्हा स्वतःला फार कमीत कमी पैसे टाकावे लागू शकतात.

Ajay Patil
Published:
business idea

Rice Processing Business:- समाजातील विविध घटकांकरिता केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात व त्यातील काही योजनांच्या माध्यमातून व्यवसाय उभारणीसाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून दिले जाते किंवा अनुदान दिले जाते.त्यामुळे बऱ्याच जणांना व्यवसाय उभारताना येणारी आर्थिक अडचण दूर होण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांची खूप मोठी मदत होत असते.

या योजनांच्या माध्यमातून जी काही आर्थिक मदत मिळते त्यामुळे व्यवसाय उभारण्यासाठी जी काही गुंतवणूक करावी लागते त्या गुंतवणुकीत स्वतःला खूप कमीत कमी पैसा टाकावा लागतो. बरेच व्यवसाय करिता योजनांच्या माध्यमातून आर्थिक मदत केली जाते.

त्यामुळे या अनुषंगाने तुम्हाला देखील जर स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा विचार असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे पुरेसे भांडवल नसेल तर या लेखात ज्या व्यवसायाची माहिती दिली आहे तो व्यवसाय सुरू करू शकतात व यामध्ये तुम्हाला सरकारी योजनेतून 90% पर्यंत कर्जदेखील मिळू शकते व तुम्हा स्वतःला फार कमीत कमी पैसे टाकावे लागू शकतात.

तांदूळ प्रक्रिया उद्योग ठरेल तुमच्यासाठी फायद्याचा
तांदूळ प्रक्रिया उद्योग हा प्रामुख्याने कृषी आधारित उद्योग असल्यामुळे तुम्ही तुमचा शेती व्यवसाय सांभाळून देखील हा उद्योग सुरू करू शकतात. विशेष म्हणजे तुम्ही कमीत कमी गुंतवणुकीत हा व्यवसाय उभारून स्वतःला आयुष्यात आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करू शकतातच व यातून सरकारी आर्थिक मदत मिळवून आरामात हा व्यवसाय उभा करू शकतात.

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला एक हजार चौरस फूट आकाराच्या शेडची आवश्यकता भासेल. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला डस्ट बॉयलरसह धान क्लिनर, पॅडी सेपरेटर, पॅडी म्हणजे तांदूळ डी हस्कर, तांदूळ पॉलिशशर तसेच कोंडा प्रक्रिया आणि एक्सपायरेटर इत्यादी यंत्रसामग्रीची देखील आवश्यकता असते.

तांदूळ प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी एकूण किती खर्च येतो?
तांदूळ प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता किमान तीन लाख रुपये इतका खर्च येतो. तसेच पन्नास हजार रुपये तुम्हाला खेळते भांडवल म्हणून आवश्यक असतात. अशाप्रकारे एकूण जर खर्च बघितला तर साडेतीन लाखात हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. परंतु यामध्ये जर तुम्ही सरकारी मदत घेतली तर तुम्हाला 90% अनुदान मिळू शकते.

तुम्हाला जर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घ्यायचे असेल तर तुम्ही पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अर्थात पीईजीपी या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता. या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला 90% पर्यंत कर्ज मिळते व तुम्हाला तुमच्या वाट्याचे फक्त 35 हजार रुपये गुंतवणूक करावी लागते.

या व्यवसायातून किती नफा मिळू शकतो?
या व्यवसायातून किती नफा मिळवायचा ही तुमच्या एकूण मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर ही सगळी गोष्ट अवलंबून राहील. तसेच तुम्ही जर 370 क्विंटल तांदळावर प्रक्रिया केली तर प्रक्रिया केलेल्या एकूण उत्पादनाची किंमत सुमारे चार लाख 45 हजार रुपयांच्या आसपास असेल.

तुम्ही जर सर्व प्रक्रिया केलेले हे तांदूळ विकले तर तुमची एकूण विक्री पाच लाख 54 हजार रुपये इतकी होते. यातून तुमचा खर्च वजा जाता एक लाख रुपयापेक्षा अधिक नफा सहज मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe