Beach In Goa:- भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळे आहेत की ज्या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने देशातीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकांची देखील मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. भारतातील जवळपास प्रत्येक राज्यात पर्यटन स्थळांची रेलचेल असून त्यामुळे पर्यटकांचा ओढा आपल्याला अशा ठिकाणी वर्षभर दिसून येतो.
अगदी याचप्रमाणे जर आपण गोव्याचा विचार केला तर या ठिकाणी फिरायला जायला मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते. गोवा म्हटलं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात अगोदर येते ते त्या ठिकाणचे नाईट लाईफ आणि सुंदर असे समुद्रकिनारे होय. त्यामुळे नववर्षाच्या पार्ट्या असो किंवा सुट्ट्यांमधील एन्जॉय असो याकरिता अनेकांची पावले गोव्याकडे वळतात.
या पद्धतीने तुम्हाला देखील कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत गोवा फिरायला जायचं असेल तर या ठिकाणी असलेल्या काही सुंदर समुद्रकिनारी म्हणजेच बीचला भेट देणे खूप गरजेचे आहे. या ठिकाणी काही बीचेस असे आहेत की ते गर्दी पासून दूर निसर्गरम्य अशा ठिकाणी असून तुम्हाला देखील निसर्गाच्या सानिध्यात ही बीचेस पाहण्यात नक्कीच आनंद मिळेल.
गोव्यातील ही बीचेस आहेत निसर्गाचा अनमोल ठेवा
1- बेतुल बीच- गोव्यातील शांत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाणारे बिच असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मच्छीमारांची वस्ती दिसून येते. तुम्हाला जर ताज्या सीफूडचा आनंद घ्यायचा असेल तर बेतुल बीच तुमच्यासाठी गोव्याला गेल्यावर उत्तम पर्याय ठरेल.
दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे बीच हिरवळ व निळ्या पाण्याकरिता सुद्धा प्रसिद्ध आहे. जर आपण या ठिकाणचे मुख्य आकर्षण पाहिले तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी शांत वातावरण अनुभवायला मिळेल आणि तुम्ही जर खवय्ये असाल तर ताज्या अशा मासळीचा आस्वाद घ्यायला देखील तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
2- बटरफ्लाय बीच- बटरफ्लाय बीच हे देखील गोव्यातील सर्वात सुंदर आणि फिरण्यासाठी उत्तम असा एक पर्याय असून कुणालाही माहिती नसलेले बीच आहे. या बीचचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी तुम्हाला फुलपाखरे खूप मोठ्या प्रमाणावर दिसून येतात व त्यामुळेच या बीचला बटरफ्लाय बीच असे म्हणतात.
या बीचला जर तुम्हाला जायचं असेल तर फक्त नावेच्या माध्यमातून तुम्हाला जाता येऊ शकते. या बीचचे मुख्य आकर्षण जर बघितले तर या ठिकाणी तुम्हाला विविध प्रजातींची फुलपाखरे पाहायला मिळतात व डॉल्फिन स्पॉट म्हणून देखील हे बीच प्रसिद्ध आहे.
3- बेतालबाटीम बीच- या बीचचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असलेले शांत वातावरण आणि पांढरी वाळू होय. गर्दी पासून हे बीच खूप दूर आहे व या ठिकाणी सूर्यास्त पाहण्याचा एक खूप मोठा आनंद पर्यटकांना अनुभवता येतो.
शुद्ध आणि ताज्या हवेचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी घेता येतो व समुद्राच्या उंचच उंच उसळणाऱ्या लाटा देखील तुमच्या मनाला वेगळीच अनुभूती देऊन जातात.या ठिकाणाचे मुख्य आकर्षण जर बघितले तर तुम्हाला या ठिकाणी कासव मोठ्या प्रमाणावर पाहता येतात व सूर्योदय आणि सूर्यास्ताचा अनोखा आनंद घेता येतो.