Gold City In India:- हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत मस्तपैकी कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जाणे व काही दिवस मस्त एन्जॉय करणे यामध्ये एक जीवनातील खूप मोठा आनंद सामावलेला असतो. दररोजची तीच तीच जीवनशैली, तोच तोच रुटीन या सगळ्या गोष्टींना आपण कंटाळतो आणि थोड्या प्रमाणात या दररोजच्या कटकटी पासून मुक्तता मिळावी
आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरता येईल असा प्लान करत असतो व ते स्वतःला एक रिचार्ज करण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे हिवाळ्याच्या कालावधीमध्ये बरेच जण कुठेतरी फिरायला जाण्याचा प्लान बनवत असतात.
अशाच पद्धतीचा प्लान तुमच्या डोक्यात सुरू असेल व कुठे जायचे याबाबत मात्र निश्चिती होत नसेल तर तुमच्यासाठी राजस्थान मधील गोल्डन सिटी म्हणून प्रसिद्ध असलेले जैसलमेर हे महत्त्वाचे ठिकाण बेस्ट ऑप्शन ठरेल. त्यामुळे आपण या लेखात जैसलमेर या पर्यटन स्थळाविषयी महत्त्वाची माहिती बघू.
जैसलमेर आहे भारताची गोल्ड सिटी
जैसलमेर हे राजस्थान राज्यामध्ये असून गोल्डन सिटी म्हणून भारतामध्ये ते प्रसिद्ध आहे. जैसलमेर हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे शहर वाळवंट सफारी आणि जैसलमेर किल्ल्यासाठी प्रामुख्याने ओळखले जाते. जैसलमेर किल्ल्याला सुवर्ण किल्ला म्हणून देखील ओळखतात.
ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी या ठिकाणी भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. तुम्ही जर जैसलमेर किल्ल्याला भेट दिली तर त्या ठिकाणी असलेले महाल मुसूम, जैन मंदिर तसेच सिटी व्ह्यू पॉईंट पाहू शकतात. याशिवाय जैसलमेरला गेल्यावर अमरसागर, सॅम सॅन्ड टील्स,
कुलधारा गाव तसेच जैसलमेर वार म्युझियम, त्या ठिकाणी असलेला गदीसर तलाव, पाटो की हवेली आणि नथमल जी की हवेली पाहू शकतात. इतकेच नाही तर जैसलमेरला गेल्यावर तुम्ही उंट सफारी आणि बोटिंग व जीप सफारी देखील करू शकतात.
खरेदीसाठी देखील आहे उत्तम ठिकाण
जैसलमेरचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी असलेले वेगवेगळ्या वस्तू स्वस्तात मिळणाऱ्या बाजारपेठा होय. या ठिकाणी तुम्हाला मिरर वर्क, भरतकाम केलेले कपडे तसेच गालिचे, विविध प्रकारचे ब्लॅंकेट, तेलाचे दिवे तसेच विंटेज स्टोन वर्क वस्तू, रंगीबिरंगी कपडे तसेच लाकडांच्या वस्तू,
रेशीमचे कापड आणि चांदीचे दागिने देखील खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात व खरेदी देखील करता येतात. तुम्ही जर जैसलमेरला गेला तर त्या ठिकाणी असलेल्या गांधी दर्शन, पसांरी बाजार, सीमा ग्राम, सदर बाजार आणि मानक चौक यासारखे बाजारपेठाना भेट देऊन मोठ्या प्रमाणावर स्वस्तात खरेदी करू शकतात.
किती लागेल बजेट?
तुम्हाला जर जैसलमेरला जायचे असेल तर दोन दिवस तुमच्यासाठी पुरेसे ठरतात. जैसलमेरला फिरायचा जर बजेट बघितला तर तुमची एकंदरी ट्रिप आणि शॉपिंग पकडून आठ ते दहा हजारांचा बजेट पुरेसा ठरतो. कुटुंबासोबत झाल तर थोडा बजेट वाढू शकतो.