अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- जामखेड पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती राजश्री मोरे यांची निवड झाली आहे.
दरम्यान पंचायत समिती सभापती पदासाठी स्थगित असलेली मतमोजणी प्रक्रिया होऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे व भाजपच्या मनिषा सुरवसे यांना समसमान मते मिळाली होती.
यावेळी चिठ्ठीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजश्री मोरे ह्या नशीबवान ठरल्या दहा महिन्यानंतर रिक्त सभापती पदाला न्याय मिळाला आहे.
राजश्री मोरे यांची निवड जाहीर करताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला व मोठय़ा प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी केली
पंचायत समितीच्या सभापती राजश्री मोरे यांची निवड होताच आ. रोहीत पवार हे पंचायत समितीच्या सभागृहात आले यावेळी त्यांनी सभापती मोरे यांचा सत्कार केला.
यावेळी आ. रोहीत पवार म्हणाले सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल ही मनोमन खात्री होती त्यामुळे तातडीने येथे आलो आहे. राजश्री ताई सभापती होताच त्यांनी
तालुक्यातील महिलांचे प्रश्न, रस्ते व पाणी याबाबत विषय घेतले. यापुढील काळात सर्व कामे मार्गी लावली जातील असा विश्वास सभापतींने व्यक्त केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved