अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ दोन शिवसेना आमदारांना मिळणार मंत्रीपदाची संधी? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरत्या मंत्रिपदाचा पॅटर्न राबवल्यास होईल फायदा

महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला व या निवडणुकांमध्ये राज्यात महायुती सरकारला प्रचंड असे बहुमत मिळाले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी देखील झाला.

Ajay Patil
Published:

Ahilyanagar News:- महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका पार पडल्या व त्यांचा निकाल देखील जाहीर झाला व या निवडणुकांमध्ये राज्यात महायुती सरकारला प्रचंड असे बहुमत मिळाले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी देखील झाला.

परंतु आता राज्यातील मंत्री मंडळामध्ये बऱ्याच आमदारांना मंत्रिपदाचे वेध लागले असून कुणाला कोणते मंत्रिपद मिळते? याबाबत आता आमदारांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत उत्सुकता लागून आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले जे काही आमदार आहेत ते नाराज होऊ नयेत याकरिता मंत्रीपदासाठीचा अडीचअडीच वर्षासाठीचा पॅटर्न म्हणजेच फिरत्या मंत्रिपदाचा पॅटर्न राबवणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे.

जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फिरत्या मंत्रिपदाचा पॅटर्न जर राबवला तर अहिल्यानगर जिल्ह्यातून शिंदे सेनेच्या दोन आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

या फिरत्या मंत्रिमंडळ पॅटर्नमध्ये जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल तेव्हा शपथ घेणाऱ्या आमदारांना शपथ घेतल्याच्या तारखेपासून अडीच वर्षापर्यंत मंत्रिपदी राहता येईल

अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना आपल्या सहकारी आमदारांकरिता आपले पद सोडावे लागेल व त्यांच्या जागी नव्या इच्छुक आमदारांची मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात येईल असा हा पॅटर्न असून तो राबवला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातून देखील दोघा आमदारांना मंत्रिपद मिळेल अशी एक शक्यता आहे.

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांचा होऊ शकतो फायदा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमधील जर आपण एक धक्कादायक निकाल बघितला तर तो संगमनेर विधानसभा मतदारसंघातला होता. या ठिकाणी माजी मंत्री व सलग आठ वेळा संगमनेर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा पराभव होय.

या मतदारसंघांमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव नवखे असलेले शिंदे सेनेचे अमोल खताळ यांनी केला. बाळासाहेब थोरात यांच्या तुलनेत जर बघितले तर आमदार खताळ यांचा जनसंपर्क खूप कमी होता. परंतु तरीदेखील त्यांनी त्यांचा पराभव केला व त्यामुळे पूर्ण राज्यात त्यांचे नाव झाले.

त्यामुळे आता अमोल खताळ आमदार झाल्यामुळे मतदार संघात त्यांचे वर्चस्व निर्माण करण्याकरिता मंत्रिपदाची संधी त्यांना मिळायला हवी असे महायुतीच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना वाटत आहे. गेल्या 40 वर्षापासून संगमनेर विधानसभा मतदारसंघावर पकड असलेले बाळासाहेब थोरात यांची पकड किंवा त्यांचे वर्चस्व जर कमी करायचे असेल तर अमोल खताळ यांना ताकद देण्याचे रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अमोल खताळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असे राजकीय जाणकारांच्यामध्ये चर्चा असल्याचे दिसून येत आहे. जर फिरत्या मंत्रिमंडळाचा पॅटर्न लागू झाला तर सुरुवातीला किंवा नंतर चाळीस वर्षाच्या कालावधीत अमोल खताळ यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे.

विठ्ठलराव लंघे यांना देखील मिळू शकते मंत्रीपद
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसरा धक्कादायक निकाल हा नेवासा मतदारसंघाचा होता. या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव शिंदे सेनेच्या विठ्ठलराव लंघे यांनी केला.

संगमनेर विधानसभा मतदारसंघ व नेवासा विधानसभा मतदारसंघ यातून अनुक्रमे थोरात व शंकरराव गडाख जरी पराभूत झाले असले तरी दोन्ही तालुक्यांचा विचार केला तर या तालुक्यातील विविध संस्था तसेच सोसायट्यांवर त्यांची पकड मजबूत आहे. इतकेच नाहीतर साखर कारखाने देखील त्यांच्याच ताब्यात आहेत.

त्यामुळे या दोन्ही नेत्यांची जर मतदारसंघांवरील पकड कमी करायची असेल तर या नवीन आमदारांना बळ देण्यासाठी त्यांना मंत्रिपद देऊन थोरात आणि गडाख यांना शह दिला जाऊ शकतो.

तसेच अहिल्यानगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा ओळखला जातो व अशा महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा विस्तार करायचा असेल व संघटना जर अधिक प्रमाणामध्ये मजबूत करायची असेल तर या दोन्ही नवीन आमदारांपैकी एखाद्या आमदाराला मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe