अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला आहे. तसेच राज्य सरकारने नुकतीच मिशन बिगीन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच नवीन नियमावली जारी केली आहे.
१५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहणार आहेत. दुकानांची वेळ याआधी ७ पर्यंत होती.
राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ दोन तासांनी वाढविण्यात आली आहे. तसा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला आहे.
या नवीन नियमावलीमध्ये अद्यापही शाळा,महाविद्यालये, जीम ३१ ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत.
मिशन बिगीन अंतर्गत राज्य शासनाने निर्णय घेतल्यानंतर नगर जिल्ह्यातही दुकानांची वेळ वाढवण्यात आली आहे.
याआधी फिरण्यावर रात्री ९ ते पहाटे ५ पर्यंत बंदी होती. त्यातही एक तास ढील देण्यात आली असून रात्री १० ते पहाटे पाच पर्यंत फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.
तसेच व्यावसायिक प्रदर्शन भरविण्यास मात्र मान्यता देण्यात आली आहे. बिझनेस टू बिझनेस असे प्रदर्शन भरविण्यास परवानगी असेल, असे आदेशात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved