तुम्हाला आहे का माहिती विवाह विम्याबद्दल? 2500 रुपयांमध्ये मिळते 20 लाखांचे विमा कव्हर; जाणून घ्या माहिती

विमा ही अतिशय महत्त्वाची अशी आर्थिक संकल्पना असून आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यकालीन जीवन हे बिनधास्तपणे जगता यावे या दृष्टिकोनातून विमा हा खूप महत्त्वाचा असतो. जीवनामध्ये कुठली गोष्ट कधी घडेल हे आपल्याला सांगता येत नाही.

Ajay Patil
Published:

Wedding Insurance:- विमा ही अतिशय महत्त्वाची अशी आर्थिक संकल्पना असून आर्थिक दृष्टिकोनातून भविष्यकालीन जीवन हे बिनधास्तपणे जगता यावे या दृष्टिकोनातून विमा हा खूप महत्त्वाचा असतो. जीवनामध्ये कुठली गोष्ट कधी घडेल हे आपल्याला सांगता येत नाही.

समजा आरोग्याच्या बाबतीत एखादी अनपेक्षितपणे घडणारी एखादी घटना असेल अशावेळी मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होते व कधीकधी या समस्या आर्थिक दृष्टिकोनातून असतात.

अशाप्रसंगी आर्थिक संरक्षण देण्यासाठी विमा खूप महत्त्वाचा ठरतो. उदाहरण घ्यायचे झाले तर आरोग्य विमा हा आजकाल खूप महत्त्वाचा असून कधी कुणाला कोणत्या आरोग्याची समस्या उद्भवेल आणि मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय खर्च करावा लागेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नसते.

अशा अचानकपणे उद्भवलेल्या वैद्यकीय खर्चा करता आरोग्य विमा खूप महत्त्वाचा ठरतो. विम्याचे वेगवेगळे असे प्रकार येतात. या प्रकारांमध्ये जर आपण बघितले तर विवाह विमा म्हणजेच वेडिंग इन्शुरन्स हा देखील एक खूप महत्त्वाचा असा विम्याचा प्रकार आहे.

आपल्याला माहित आहे की लग्नकार्य ही प्रतिष्ठेची बाब असते व आजकालच्या परिस्थितीमध्ये लग्न समारंभांना मोठ्या प्रमाणावर खर्च केला जातो. परंतु बऱ्याचदा अशा काही नकोशा गोष्टी घडतात की त्यामुळे लग्न सोहळा रद्द होतो किंवा काही प्रकारचे नुकसान होऊ शकते.

अशा परिस्थितीमध्ये तुमच्या मदतीला विवाह विमा म्हणजेच वेडिंग इन्शुरन्स धावून येतो व तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून सुरक्षित करतो. म्हणून या लेखामध्ये आपण विवाह विमा व त्याचे स्वरूप थोडक्यात जाणून घेणार आहोत.

काय आहे विवाह विम्याचे स्वरूप?
वेडिंग इन्शुरन्स म्हणजेच विवाह विमा हा अतिशय असा फायदेशीर विम्याचा प्रकार असून एखाद्या कारणामुळे जर लग्न सोहळा रद्द झाला किंवा लग्नासाठी आणलेले दागिने चोरीला गेले,

एखाद्या आपत्तीमुळे नुकसान झाले तर तुम्हाला या विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई मिळू शकते. तुम्हाला जर विवाह विमा घ्यायचा असेल तर या विम्याचा हप्ता म्हणजेच प्रीमियम हे त्या विम्याच्या माध्यमातून किती कव्हरेज तुम्हाला मिळणार आहे? यावर प्रामुख्याने अवलंबून असते.

उदाहरणच घ्यायचे झाले तर समजा विवाह सोहळा रद्द झाला व त्यातून नुकसान भरपाई मिळवण्यासाठी जर विमा घ्यायचा असेल तर 2500 रुपये आणि जीएसटी इतका प्रीमियम म्हणजेच हप्ता भरून तुम्हाला 20 लाखापर्यंत कव्हरेज मिळते.

विवाह विम्याचे प्रकार किती?

1- लग्न सोहळा रद्द होणे किंवा पुढे ढकलणे किंवा पोस्टपोन होणे- एखाद्या वेळेस आग किंवा वादळ, भूकंप तसेच पूरस्थिती किंवा इतर नैसर्गिक आपत्तीमुळे जर लग्न सोहळा रद्द करावा लागला किंवा स्थगित करावा लागला तर अशाप्रसंगी हा विमा महत्वाचा ठरतो.

2- लायबिलिटी- या प्रकारामध्ये एखाद्याला दुखापत झाली व संपत्तीचे काही नुकसान झाले तर ते कव्हर केले जाते.

3- थर्ड पार्टी किंवा वेंडरकडून झालेले नुकसान- यामध्ये लग्नपत्रिकांचा खर्च तसेच केटरर्स, लग्नाचा हॉल तसेच सजावट, बँडवाल्यांना आगाऊ रक्कम देणे तसेच हॉटेल व ट्रॅव्हल तिकीटसाठी रिझर्वेशन इत्यादी खर्चाचा समावेश यामध्ये तुम्ही करू शकतात.

4- दाग दागिने- लग्नामध्ये दागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते व एखाद्या वेळी जर लग्नात घेतलेले दागिने हरवले वा चोरी झाले तर तुम्हाला या माध्यमातून विमा कव्हर उपलब्ध होते.

विवाह विम्यामध्ये या गोष्टी होत नाहीत कव्हर
वेडिंग इन्शुरन्स म्हणजेच विवाह विम्यामध्ये युद्ध, संप किंवा बंद, दंगल वा दहशतवादी कारवायांमुळे जर लग्नसोहळा रद्द झाला तर विवाह विमा पॉलिसीअंतर्गत ज्या व्यक्तीला विमा कव्हर आहे अशा व्यक्तीच्या अपहरण झाल्यास इन्शुअर्ड व्यक्तीच्या माध्यमातून किंवा त्याच्या निर्देशानंतर दुसऱ्याकडून नुकसान झाल्यास अशा नुकसानीसाठी या विमा अंतर्गत कव्हर मिळत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe