मिळेल 25 लाखापर्यंतच्या गृहकर्जावर व्याज अनुदान! काय आहे मध्यमवर्गीयांसाठी महत्त्वाची असलेली केंद्र सरकारची योजना?

जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पहिल्या टर्म मध्येच प्रधानमंत्री आवास योजना- शहरी सुरू केली होती व याच योजनेचा दुसरा टप्पा आता ऑगस्ट 2024 मध्ये मंजूर झाला आहे.

awaas scheme

PMAY-U 2.0 Scheme:- जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने पहिल्या टर्म मध्येच प्रधानमंत्री आवास योजना- शहरी सुरू केली होती व याच योजनेचा दुसरा टप्पा आता ऑगस्ट 2024 मध्ये मंजूर झाला आहे.

या योजनेच्या माध्यमातून सरकार शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या मालकीचे घर घेण्याचे स्वप्न साकार करण्याकरिता आर्थिकदृष्ट्या मदत करते. या योजनेअंतर्गत 1.18 कोटी घरे मंजूर करण्यात आली होती

व त्यापैकी जवळपास 85.5 लाखापेक्षा जास्त घरे पूर्ण करून ते लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत व अजून उर्वरित घरांचे बांधकाम सुरू आहे. आता या योजनेचा दुसरा टप्पा सुरू असून या दुसऱ्या टप्प्यात 2.30 लाख कोटींची सरकारी मदत आता देण्यात येणार आहे.

काय आहे या योजनेसाठीचे पात्रता?
पंतप्रधान आवास योजना- शहरीचा लाभ फक्त आर्थिक दृष्ट्या(ईडब्ल्यूएस)/ निम्न उत्पन्न गट(LIG)/ मध्यम उत्पन्न गट(एमआयजी) या वर्गवारीत मोडणाऱ्या लोकांनाच मिळतो. तसेच लाभार्थ्याकडे देशात कुठेही स्वतःचे कोणत्याही स्वरूपाचे कायमस्वरूपी घर नसणे आवश्यक आहे. अशाच व्यक्तींना या योजनेअंतर्गत घर खरेदी किंवा बांधकाम करण्यास पात्र समजले जाते.

EWS/LIG/MIG म्हणजे नेमके काय?
या संकल्पने अंतर्गत जर बघितले तर ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापर्यंत आहे ते EWS श्रेणीमध्ये येतात. तसेच या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख आहे अशी कुटुंब निम्न उत्पन्न गट म्हणजेच LIG या श्रेणीत येतात व सहा लाख ते नऊ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले कुटुंब मध्यम उत्पन्न गट म्हणजेच MIG या श्रेणीत येतात.

तसेच ही योजना लाभार्थी आधारित बांधकाम म्हणजेच BLC व्यतिरिक्त परवडणारी घरे भागीदारी(AHP), परवडणारी भाड्याने घरे(ARH) आणि व्याज अनुदान योजना म्हणजेच ISS अंतर्गत लागू केली आहे.

BLC आणि AHP म्हणजे नेमके काय?
यामध्ये लाभार्थी आधारित बांधकाम म्हणजेच बीएलसी द्वारे ईडब्ल्यूएस श्रेणीतील वैयक्तिक पात्र कुटुंबांना त्यांच्या जमिनीवर नवीन घर बांधण्याकरिता केंद्रीय सहाय्य प्रदान केले जाते. तसेच परवडणारी घरे भागीदारी म्हणजेच AHP अंतर्गत परवडणारी घरे सार्वजनिक/ खाजगी संस्थेद्वारे बांधले जातील

आणि ईडब्ल्यूएस लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य देऊन वाटपासाठी उपलब्ध करून दिली जातात.शहरी स्थलांतरित कामगार महिला/ औद्योगिक कामगार/ शहरी स्थलांतरित/ बेघर/ निराधार/ विद्यार्थी आणि इतर तत्सम भागधारक यांच्या लाभार्थीसाठी परवडणारी भाड्याने घरे म्हणजेच ARH मध्ये पुरेशी भाड्याची घरे बांधली जातील.

व्याज अनुदान योजना नेमकी काय आहे?
या योजनेअंतर्गत जर आपण व्याज अनुदान योजना पाहिली तर यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच निम्न उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गट इत्यादी कुटुंबासाठी गृहकर्जावर सबसिडी दिली जाते. 35 लाख रुपयापर्यंतच्या घरासाठी 25 लाखपर्यंतची गृह कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांना यामध्ये विशेष सुविधा मिळते.

असे लाभार्थी बारा वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी पहिल्या आठ लाख रुपयांच्या कर्जावर चार टक्के व्याज अनुदानासाठी पात्र असतील. पात्र लाभार्थ्यांना 1.80 लाखांचे अनुदान पाच वर्षे हप्त्यांमध्ये जारी केली जाईल.

पात्र लाभार्थी या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्याकरिता त्यांच्या पात्रतेनुसार आणि निवडीनुसार चार घटकांपैकी एका घटकाची निवड करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe