जिल्ह्यात झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-मागील दोन दिवस जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. काही भागात विजांच्या कडकडाटासह संततधार सुरू होती. जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८३७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तलाव ओव्हरफ्लो झाले असून काही नद्यांवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक भागात पावसामुळे दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर आली.

सोयाबिन, बाजरी पिकासह कांद्याचेही मोठे नुकसान झाले. मुळा, प्रवरा, घोड, भीमा नदीतील पाण्यात वाढ होत असल्याने सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याची सूचना प्रशासनाने दिली आहे.

नगर शहरात बुधवारी सायंकाळपासून मध्यरात्रीपर्यंत जोरदार पाऊस झाल्याने मध्यभागात पाणी साचले. शुक्रवारीही दिवसभर कमी-अधिक प्रमाणात सरी बरसत होत्या. पावसामुळे इवळे गल्लीत भिंत कोसळली. सुदैवाने मोठी हानी झाली नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment