आयुष्यभर लाखोत खेळायचे तर शेती संबंधित ‘हा’ व्यवसाय सुरू करा! एकदा केलेली सुरुवात आयुष्यभर देईल पैसा

भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही कृषी क्षेत्र व त्याच्याशी संबंधित असलेल्या उद्योग व्यवसायाशी निगडित आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीत बघितले तर अनेक प्रकारचे व्यवसाय या क्षेत्राशी निगडित आहेत व त्यामुळे अशा प्रकारचे व्यवसाय जर सुरू केले तर नक्कीच या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येणे शक्य आहे.

Ajay Patil
Published:
business idea

Agri Related Business Idea:- भारत हा कृषीप्रधान देश आहे व भारताची बहुसंख्य लोकसंख्या ही कृषी क्षेत्र व त्याच्याशी संबंधित असलेल्या उद्योग व्यवसायाशी निगडित आहे. कृषी क्षेत्राच्या बाबतीत बघितले तर अनेक प्रकारचे व्यवसाय या क्षेत्राशी निगडित आहेत व त्यामुळे अशा प्रकारचे व्यवसाय जर सुरू केले तर नक्कीच या माध्यमातून चांगला पैसा मिळवता येणे शक्य आहे.

शेती संबंधित व्यवसायांमध्ये जर बघितले तर अनेक प्रक्रिया उद्योगांना मोठी संधी आहे व शेती मालावर प्रक्रिया करणारी युनिट उभारून शेतकरी शेती सोबतच एक चांगला व्यवसायिक होण्याच्या दृष्टिकोनातून देखील पुढे येण्यास या क्षेत्रात संधी आहेत.

त्यामुळे तुम्हाला देखील जर एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल व तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्ही सोयाबीन प्रक्रिया युनिट उभारून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. भारतामध्ये सोयाबीनची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते व सोयाबीनला शेतकऱ्यांचे सोने असे म्हटले जाते.

सोयाबीनचा अनेक प्रकारे उपयोग होतो व त्याच्यात आवश्यक पोषक घटक जसे की प्रथिने हे मुबलक प्रमाणात असल्यामुळे बाजारात देखील त्याची मागणी नेहमी जास्त असते. त्यामुळे सोयाबीन प्रक्रिया युनिट व्यवसाय हा नवीन व्यवसायात येणाऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो.

सोयाबीन प्रक्रिया व्यवसायामध्ये आहेत मोठ्या संधी
सोयाबीन प्रक्रिया युनिट सुरू करून तुम्ही चांगला पैसा मिळवू शकतात. याकरिता तुम्हाला ज्या ठिकाणी सोयाबीनची लागवड जास्त प्रमाणात होते अशा ठिकाणाची निवड करावी लागेल.

जेणेकरून तुम्हाला कमी बाजारभावात प्रक्रिया करता सोयाबीन उपलब्ध होऊ शकेल. भारताच्या दृष्टिकोनातून बघितले तर भारताचा सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत जगात पाचवा क्रमांक लागतो व दरवर्षी साधारणपणे 98 लाख टन सोयाबीन उत्पादन होते.

त्यापैकी सर्वात जास्त उत्पादन मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान राज्यांमध्ये होते व त्या खालोखाल आंध्र प्रदेश, कर्नाटक तसेच छत्तीसगड आणि तामिळनाडू राज्यांचा क्रमांक लागतो.सोयाबीन युनिटमध्ये तुम्ही सोयाबीन वर आधारित अनेक उत्पादने बनवू शकतात.

जसे की सोयाबीन तेल, टोफू, मैदा, सोया दूध, सोया बिस्किटे आणि लेसिथिन यासारखे अनेक पदार्थ सोयाबीन पासून बनवणे शक्य आहे व या सगळ्या उत्पादनांना चांगली मागणी असल्यामुळे सोयाबीन प्रक्रिया व्यवसाय सध्या आपल्याला झपाट्याने वाढताना दिसून येत आहे.

सोयाबीन प्रक्रिया युनिटमध्ये कशा पद्धतीने चालते काम?
सोयाबीनवर प्रक्रिया करण्यासाठी सगळ्यात अगोदर सोयाबीन गाळून त्यातून माती आणि कचरा वेगळा केला जातो व त्यानंतर देखील यंत्राच्या साह्याने सोयाबीन मध्ये असलेले देठ तसेच खडे व साल काढून स्वच्छ केले जाते. व्यवस्थितपणे सोयाबीन साफ केल्यानंतर सोयाबीनची डाळ तयार केली जाते व त्या डाळीपासून साल वेगळे करण्याची प्रक्रिया केली जाते.

नंतर डाळीमधून साले काढून ती ट्रॅकरमध्ये ठेवली जातात आणि डाळींचे लहान तुकडे केले जातात व नंतर ते कुकरमध्ये टाकून उकळले जातात. तो चांगला मऊ झाल्यावर फ्लेक्स मशीनद्वारे केक तयार केला जातो व या केकमधून तेल काढले जाते. तेल काढल्यावर ते शुद्ध करून विक्रीकरिता पॅक केले जाते.

यानंतर या केक पासून डीऑइल केलेला केक बनवला जातो आणि त्याची प्रतवारी केली जाते. या केकपासून सोयाबीन आणि सोयाबीन टोस्ट बनवले जातात. तसेच याचा जनावरांच्या खाद्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वापर होतो. अशा पद्धतीने अनेक प्रक्रियायुक्त उत्पादने या माध्यमातून तयार करतात.

सोयाबीन प्रक्रिया युनिट उभारण्यासाठी आवश्यक असतो परवाना
तुम्हाला सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आवश्यक ते परवाने घ्यावे लागतात. तसेच तुम्हाला तुमच्या व्यवसायाची नोंदणी देखील करावी लागते व त्यानंतर जीएसटी नोंदणी देखील आवश्यक असते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe