Sandalwood Farming:- कृषी क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर प्रगती होऊ लागली असून कृषी क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे असे अनेक प्रकारचे आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांनी देखील आता विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेती पद्धती विकसित केल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकरी विविध पिकांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत.
विविध फळबागांची लागवड तसेच भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हे शक्य झाले आहे. तसेच बरेच शेतकरी या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या वृक्षांच्या लागवडीतून देखील चांगले उत्पन्न मिळवत आहेत. यामध्ये बांबू तसेच साग लागवड यांचा समावेश आपल्याला करता येईल.
परंतु वृक्ष लागवडीच्या दृष्टिकोनातून जर बघितले तर चंदनाची लागवड देखील फायद्याची असून भारतातील अनेक राज्यांमध्ये आता शेतकरी चंदनाची लागवड देखील करू लागले आहेत.
विशेष म्हणजे उत्तम व दर्जेदार चंदनाची रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी त्या दृष्टिकोनातून केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्थेत या विषयाच्या तंत्रज्ञानावर संशोधन केले जात असून यासाठीचे आवश्यक प्रशिक्षण शेतकऱ्यांना मिळू लागले आहे व हे प्रशिक्षण घेतल्यानंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न अनेक पटीने वाढण्यास मदत झाली आहे.
शेतकऱ्यांसाठी चंदनाची लागवड खूप फायद्याची असून शेतकऱ्यांनी जर 50 झाडांची लागवड केली तरी देखील पंधरा वर्षात शेतकरी करोडपती होऊ शकतात एवढी क्षमता चंदनामध्ये आहे.
चंदनाची लागवड शेतकऱ्यांसाठी ठरेल फायद्याची
शेतकऱ्यांनी चंदनाची 50 झाडे जरी लावली तरी देखील पंधरा वर्षांमध्ये शेतकऱ्यांना कोटी रुपयांमध्ये उत्पन्न मिळू शकते. चंदनाच्या झाडाचे वैशिष्ट्ये जर बघितले तर हे झाड जितके जुने होते तितकी त्याची किंमत वाढते.
पंधरा वर्षानंतर एका झाडाची किंमत दोन लाख रुपयांपर्यंत जाते व जर एखाद्या व्यक्तीने 50 झाडे लावली तर पंधरा वर्षे त्याची मूल्य एक कोटी रुपयांपर्यंत देखील होऊ शकते.
म्हणजेच यानुसार जर वार्षिक सरासरी उत्पन्न बघितले तर ते 8.25 लाख रुपये पेक्षा जास्त असू शकते असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. चंदनाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो. पूजेत टिळक लावण्या सोबतच त्याचे चंदनाचे पांढरे लाकूड आणि लाल चंदनाच्या मूर्ती बनवणे, सजावटीचे साहित्य,
हवन आणि अगरबत्ती बनवणे तसेच सुगंधी द्रव्य आणि अरोमाथेरपी इत्यादी करिता याचा वापर केला जातो. इतकेच नाही तर आयुर्वेदात देखील चंदनापासून अनेक औषधे तयार केली जातात. आता जर आपण बघितले तर दक्षिण भारतामध्ये चंदनाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते.
केंद्र सरकारने 2001 मध्ये चंदन लागवडीवरील बंदी उठवल्यानंतर शेतकऱ्यांचा आता चंदन लागवडीकडे कल वाढताना दिसून येत आहे. यासंबंधीच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना पुरेशी नसल्याने हव्या त्या प्रमाणात चंदनाची लागवड क्षेत्रात वाढ होऊ शकली नाही.
चंदनाच्या शेजारी लावावे लागतात दुसरी रोपे कारण…
चंदनाचा विचार केला तर हे परपजीवी वनस्पती असल्याने ते स्वतःचे पोषण स्वतः करू शकत नाही. चंदनाचे झाड हे दुसऱ्या झाडांच्या मुळापासून पोषण तत्व घेते. त्यामुळे चंदनाचे रोप ज्या ठिकाणी असेल त्याच्या शेजारी दुसऱ्या झाडांची रोपे देखील लावावी लागतात.
यामध्ये चंदन आपली मुळे त्याच्या शेजारी लावलेल्या झाडाच्या मुळापर्यंत पसरवते आणि स्वतःला त्याच्या मुळाशी जोडून त्यातून आपले पोषण करते.चंदन लागवडीमध्ये दोन झाडातील अंतर किती असावे? चंदना सोबत कोणते पिकांची लागवड करता येणे शक्य आहे? याबाबतीत शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश राज्यातील कर्नाल येथे प्रशिक्षण देखील दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
चंदनाच्या शेती सोबत इतर फळझाडांची लागवड करणे देखील शक्य आहे. कारण चंदनाचे झाड वाढण्यास पंधरा वर्षे लागतात व त्यामुळे त्यामध्ये जर दुसऱ्या फळ झाडांची लागवड केली तर शेतकऱ्यांना दोन्ही बाजूंनी फायदा मिळू शकतो.