माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 25 वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी केले आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने आयोजित सहकारमहर्षी T – 20 क्रिकेट स्पर्धेच्या 25 वर्षाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, मालपाणी उद्योग समूहाचे गिरीश मालपाणी, ओंकार सोमानी, सुधाकर जोशी, के.के.थोरात, रामहरी कातोरे,वैभव शहा,कल्पेश मेहता, राजेंद्र काजळे, राहुल गडगे, विश्वासराव मुर्तडक,नितीन हासे, गणेश मादास, संकेत शहा, ॲड.सुहास आहेर, अमर कतारी, नितीन अभंग, शैलेश कलंत्री,निखिल पापडेजा,आसिफ तांबोळी, मनीष माळवे, संदीप लोहे अंबादास आडेप आदींसह क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर मध्ये सुसज्ज क्रीडा संकुल व्हावे ही भाऊसाहेब थोरात यांची खूप इच्छा होती. याकरता त्यांनी शेतकी संघाची एक एकर जागा व उर्वरित जागा गोखले एज्युकेशन कडून घेऊन क्रीडा संकुलाला दिली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये अत्यंत अद्यावत असे हे क्रीडा संकुल उभारले गेले. खेळाच्या सुविधा निर्माण केल्या गेल्या. राज्यभरात कोठे नाही अशी व्यवस्था आपण तयार केली आहे. मागील पंचवीस वर्षापासून जयहिंदच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धा होत असून अत्यंत चांगल्या नियोजनामुळे आयपीएल आणि रणजी मधील अनेक खेळाडू या ठिकाणी सहभागी होत असतात. प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षकांची मोठी उपस्थिती राहत असून येणाऱ्या 17 दिवसांमध्ये संगमनेर मधील सर्व क्रीडा रसिकांसाठी या स्पर्धा मोठी मेजवानी ठरणार आहे.
तर मा.आमदार डॉ.तांबे म्हणाले की, क्रिकेट या खेळांमधून सांघिक भावना वाढीस लागत असून जय पराजय पेक्षा खिलाडू वृत्ती निर्माण होते. हे अत्यंत चांगले आहे. संगमनेरचे नाव क्रिकेट मधून अजिंक्य रहाणे सह अनेकांनी देशपातळीवर नेले आहे. या पुढील काळातही युवकांनी विविध खेळांमधून संगमनेरचे नाव देशपातळीवर पुढे घेऊन जावे असे आवाहन त्यांनी केले. तर गिरीश मालपाणी म्हणाले की, खेळाडूंसह प्रेक्षकांसाठी असलेल्या चांगल्या सुविधांमुळे या प्रत्येक सामन्याचा थरार हा रोमांचकारी ठरत असतो.
यावेळी गिरीश गोरे, गौरव डोंगरे,हैदरअली सय्यद, एकनाथ श्रीपाद, प्रशांत गुंजाळ, हर्षवर्धन सातपुते, जयेश जोशी, कमलेश उनवणे, खलील पिरजादे,महेंद्र भालारे, मनीष काकडे, मयूर जाधव, मोंटू ओझा,नामदेव मुटकुळे, प्रवीण गुंजाळ,रमेश नेहे,रवी शिंदे, रोशन आमले, सचिन भालेकर,सौरभ उमरजी,शेखर सोसे,श्रेयस करपे,शुभम परदेशी, सुमित काळंगे,स्वप्नील खोजे,अनिल शेळके,हर्षल रहाणे,सुमित पानसरे,सागर कानकाटे आदींसह क्रिकेट असोसिएशनचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप लोहे यांनी केले तर अंबादास आडेप यांनी आभार मानले. पहिल्या सत्रामध्ये एसएमबीटी कॉलेज नंदीहील विरुद्ध जिजामाता क्रिकेट अकॅडमी यांच्यामध्ये सामना खेळवला गेला.
संपूर्ण मैदानावरील हिरवळी सह उत्कृष्ट नियोजनाने सजले क्रीडा संकुल