एफडी करा परंतु तुमच्या नावे नाहीतर तुमच्या पत्नीच्या नावे! वाचाल फायदे तर व्हाल खुश

मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा भारतीयांचा गुंतवणुकीसाठी असलेला प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा प्रकार आहे. ज्यांना गुंतवणूक करताना थोडी सुद्धा जोखीम घ्यायची नसते आणि तरी चांगला परतावा मिळवायचा असतो अशा गुंतवणूकदारांसाठी एफडी हा उत्तम पर्याय आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार एफडी करण्याला प्राधान्य देतात.

Ajay Patil
Published:
fd rule

FD Rule:- मुदत ठेव म्हणजेच फिक्स डिपॉझिट हा भारतीयांचा गुंतवणुकीसाठी असलेला प्रसिद्ध आणि लोकप्रिय असा प्रकार आहे. ज्यांना गुंतवणूक करताना थोडी सुद्धा जोखीम घ्यायची नसते आणि तरी चांगला परतावा मिळवायचा असतो अशा गुंतवणूकदारांसाठी एफडी हा उत्तम पर्याय आहे व त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार एफडी करण्याला प्राधान्य देतात.

यामध्ये जर आपण बघितले तर साधारणपणे प्रत्येक बँकेच्या माध्यमातून एफडी योजना राबविण्यात येतात व त्यासोबत पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून देखील एफडी योजना राबवण्यात येते.

गुंतवणूकदारांना त्यांच्या पसंतीच्या कालावधीनुसार एफडी करण्याची मुभा या माध्यमातून मिळते. त्यामुळे महत्त्वाच्या असलेल्या या एफडी बद्दल जर आपण एक फायदेशीर गोष्ट बघितली तर ती म्हणजे एफडी जर तुम्ही तुमच्या ऐवजी तुमच्या पत्नीच्या नावे केली तर

तुम्हाला काही अतिरिक्त फायदे मिळू शकतात व त्यातून तुम्ही बराच पैसा वाचवू शकतात. या अनुषंगाने पत्नीच्या नावाने एफडी केल्यावर नेमके कोणते फायदे मिळतात याबद्दलची माहिती आपण या लेखात बघू.

एफडी केल्यावर मिळणाऱ्या व्याजावर टीडीएसच्या संदर्भातील फायदा
मुदत ठेव म्हणजेच एफडी केल्यावर जे काही व्याज मिळते त्या व्याजावर ग्राहकांना टीडीएस भरावा लागतो. यामध्ये तुमच्या एफडीतून तुम्ही जी काही कमाई करतात ती कमाई तुमच्या एकूण कमाईमध्ये जोडली जाते व तुम्हाला जास्त कर भरावा लागू शकतो.

पण हे जर तुम्हाला टाळायचे असेल तर उत्तम मार्ग म्हणजे तुम्ही तुमच्या नावावर एफडी करण्यापेक्षा तुमच्या पत्नीच्या नावावर केली तर तुम्ही टॅक्स चांगल्या प्रकारे वाचवू शकतात. पत्नीच्या नावावर तुम्ही एफडी केली तर तुम्हाला चांगला फायदा मिळतो.

कारण नियमानुसार बघितले तर स्त्रिया या कमी कर कक्षेमध्ये येतात व दुसरीकडे जर तुमची पत्नी हाउसवाइफ म्हणजेच गृहिणी असेल तर त्या कर कक्षेच्या बाहेर असतात. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केली तर तुमची टीडीएस भरण्यापासून मुक्तता होऊ शकते व तुम्हाला जास्तीचा कर भरणे देखील टाळता येते.

टीडीएस कट होण्याचा काय आहे नियम?
तुम्ही जी एफडी केलेली आहे त्यावर मिळणारे व्याज जर एका आर्थिक वर्षामध्ये 40,000 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला दहा टक्के टीडीएस यामध्ये भरावा लागतो. परंतु यामध्ये तुमच्या पत्नीचे उत्पन्न कमी असेल तर फॉर्म 15G भरून टीडीएस पेमेंट टाळू शकतात.

तसेच तुम्ही तुमच्या पत्नी सोबत संयुक्त एफडी केली असेल व फस्ट होल्डर तुमच्या पत्नीला तुम्ही केले असेल तरी देखील तुम्ही टीडीएस भरण्याबरोबरच जास्त कर भरण्यापासून देखील वाचू शकतात. त्यामुळे तुमच्या पत्नीच्या नावावर एफडी केल्याने तुम्हाला फायदाच होतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe