‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट जिल्ह्यात सर्वाधिक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यामध्ये देखील चांगलीच घट झाली आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे.

यातच जिल्ह्यातील संगमेनर तालुका हा सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेला तालुका म्हणून नावाजला होता. अशा या तालुक्याने स्वतःवरील ठपका पुसत आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.

गेल्या पंधरा दिवसात चढ-उतार करीत समोर येणार्‍या आकडेवारीने संगमनेरकरांच्या चिंतेत भर घातली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रुग्णसंख्येत चढ-उतार अनुभवण्यास येत असले तरीही

रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण तब्बल 92 टक्क्यांवर पोहचली आहे. चालू महिन्यात रुग्णगतीतला चढ-उतार अनुभवायला मिळाला असला तरीही

अगदी सुरुवातीला रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 42 टक्क्यांवर असताना आजच्या स्थितीत त्यात आमुलाग्र बदल होवून आज तब्बल 92 टक्के रुग्ण बरे होत असल्याने संगमनेर तालुक्यासाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे.

चालू महिन्यात कोविडचे संक्रमण होवून मृत्यू होण्याचे प्रमाणही कमी झाल्याने आजच्या स्थिती संगमनेर तालुक्याचा मृत्यू दर अवघा 1.02 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

वाढत्या रुग्णसंख्येतही रुग्ण बरे होण्याचे आणि संक्रमणात मृत्यू होण्याचे प्रमाण समाधानकारक असल्याने संगमनेरकर काहीसा सुखावला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment