तुमच्या नावावर दुसरे कोणीतरी सिम कार्ड तर वापरत नाही ना? उगीचच अडकाल कायद्याच्या कचाट्यात! अशापद्धतीने करा चेक

बऱ्याचदा आपण वाचले असेल किंवा ऐकले असेल की एखादा गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यांमध्ये सापडतो व त्याने या गुन्ह्यामध्ये कॉल करण्यासाठी किंवा काही कामासाठी मोबाईल वापरलेला असतो व त्या मोबाईल मधील जे काही सिम कार्ड असते ते त्याच्या आयडीवर किंवा त्याच्या नावावर नसून दुसऱ्याच कुणाच्या नावावर असते.

Ajay Patil
Published:
sim card

बऱ्याचदा आपण वाचले असेल किंवा ऐकले असेल की एखादा गुन्हेगार एखाद्या गुन्ह्यांमध्ये सापडतो व त्याने या गुन्ह्यामध्ये कॉल करण्यासाठी किंवा काही कामासाठी मोबाईल वापरलेला असतो व त्या मोबाईल मधील जे काही सिम कार्ड असते ते त्याच्या आयडीवर किंवा त्याच्या नावावर नसून दुसऱ्याच कुणाच्या नावावर असते.

म्हणजेच त्याने वापरलेले सिम कार्ड हे दुसऱ्या कोणाच्यातरी व्यक्तीच्या आयडीवर असते. त्यामध्ये विशेष म्हणजे आपला आयडी कोणीतरी दुसरा व्यक्ती वापरत आहे याची तसूभरही माहिती संबंधित व्यक्तीला नसते. असा प्रकार जर घडला तर कुठलाही गुन्हा नसताना विनाकारण त्रास होण्याची शक्यता वाढते व एखाद्या वेळेस कायदेशीर समस्यांना देखील तोंड द्यावे लागते.

त्यामुळे तुम्हाला देखील जर वाटत असेल की तुमच्या आयडीवर कुणी सिम कार्ड वापरत आहे की नाही? हे तर तुम्हाला माहित करून घ्यायचे असेल तर ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून तपासू शकतात. तुमच्या आयडीवर किती सिम सक्रिय आहेत हे जाणून घेण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत त्या जर तुम्ही वापरल्या तर अगदी मोफत तुम्ही घरबसल्या याबद्दलची माहिती मिळवू शकतात.

या स्टेप्स वापरा आणि तुमच्या नावावर किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहेत ते तपासा

1- याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला tafcop.dgtelecom.gov.in या पोर्टल वर जावे लागेल.

2- या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि ओटीपीच्या मदतीने लॉगिन करावे लागेल.

3- त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयडीवर चालू असलेल्या सर्व नंबरचा तपशील मिळेल.

4- या नंबरच्या यादीमध्ये तुम्हाला माहीत नसलेला कोणताही क्रमांक असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकतात.

5- याकरिता नंबर आणि नॉट माय नंबर हा पर्याय निवडावा.

6- त्यानंतर खाली असलेल्या रिपोर्ट बॉक्स वर क्लिक करावे.

7- तक्रार दाखल केल्यानंतर तुम्हाला तिकीट आयडी संदर्भ क्रमांक देखील मिळतो

8- अशाप्रकारे सोप्या पद्धतीने तो नंबर बंद होईल किंवा तुमच्या आधार कार्ड मधून काढून टाकला जाईल.

नियमानुसार एक आयडीवर किती सिम कार्ड घेता येऊ शकतात?
याबाबत नियम बघितला तर एका आयडीवर आता फक्त नऊ सिम कार्ड सक्रिय करता येऊ शकतात व भारतातील जम्मू-काश्मीर तसेच आसाम व ईशान्य कडील राज्यांच्या आयडीवर फक्त सहा सिम कार्ड ऍक्टिव्ह करता येणे आता शक्य आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe