‘या’ टिप्स वापरा आणि तुमचा लहान व्यवसाय मोठा करा! व्यवसाय येईल भरभराटीला

तुम्ही लहान स्वरूपात व्यवसाय सुरू केला किंवा मोठ्या स्वरूपात यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा काही फरक पडत नाही. परंतु व्यवसाय उभा केल्यानंतर तो व्यवसाय भरभराटीला नेण्यासाठी तुम्ही त्यासंबंधी महत्त्वाचे असलेल्या कुठल्या धोरणात्मक गोष्टींची आखणी करत आहात व त्याची अंमलबजावणी कशी करत आहात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

Ajay Patil
Published:
business tips

Business Growth Tips:- तुम्ही लहान स्वरूपात व्यवसाय सुरू केला किंवा मोठ्या स्वरूपात यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा काही फरक पडत नाही. परंतु व्यवसाय उभा केल्यानंतर तो व्यवसाय भरभराटीला नेण्यासाठी तुम्ही त्यासंबंधी महत्त्वाचे असलेल्या कुठल्या धोरणात्मक गोष्टींची आखणी करत आहात व त्याची अंमलबजावणी कशी करत आहात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात.

यामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजी खूप महत्त्वाची ठरते व त्याहून महत्त्वाचे ठरते ते म्हणजे तुम्ही ग्राहकांना देत असलेली तुमची सेवा होय. जेव्हा सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध रीतीने पुढे नेल्या जातात तेव्हा व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचतो.या अनुषंगाने या लेखामध्ये आपण अशा काही टिप्स बघणार आहोत ज्या तुमचा छोटा व्यवसाय मोठा करण्यासाठी तुम्हाला फायदेशीर ठरतील.

या टिप्स वापरा आणि एका वर्षात तुमचा छोटा व्यवसाय मोठा करा

1- सगळ्यात अगोदर तुमचे वार्षिक उद्दिष्ट ठरवा- सगळ्यात अगोदर तुम्ही व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला एका वर्षाच्या आत कुठल्या गोष्टी करायचे आहेत या संबंधीची उद्दिष्ट अगोदर निश्चित करा व ते उद्दिष्ट निश्चित करताना त्यामध्ये स्पष्टता असणे खूप गरजेचे आहे आणि किती कालावधीत तुम्हाला ते साध्य करायचं आहे हे देखील ठरवा.

हे केल्याने तुम्हाला नेमके कुठपर्यंत जायचे आहे किंवा तुम्हाला काय साध्य करायचे आहे हे समजते व त्या दिशेने तुम्हाला काम करता येते.

2- बाजारपेठेचा अभ्यास करून समजून घ्या- तुम्ही व्यवसाय उभा केल्यानंतर तुमची बाजारपेठ नेमकी कशी आहे आणि कोणती आहे याची समज तुम्हाला येणे खूप गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित असलेले तुमचे ग्राहक ओळखण्याकरिता नेमक्या ग्राहकांच्या गरजा समजून घेण्याकरिता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बाजारामध्ये तुमचे जे काही प्रतिस्पर्धी असतील

त्यांचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला मार्केट रिसर्च करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही बाजारपेठेचा अशा पद्धतीने अभ्यास कराल तेव्हा बाजारपेठेतील मागणी तुम्हाला समजेल व त्या प्रमाणे तुम्हाला तुमची उत्पादने किंवा सेवा तयार करता येतील.

3- ऑनलाइन प्रेझेन्स वाढवण्यावर लक्ष द्या- तुमचा व्यवसाय तुम्ही उभा केल्यानंतर त्या व्यवसायाची संपूर्ण माहिती मिळेल अशा प्रकारची एक अत्याधुनिक अशी वेबसाईट तयार करणे आवश्यक आहे व ती वेबसाईट स्मार्टफोनवर सुद्धा चांगल्या प्रकारे दिसणे गरजेचे आहे.

म्हणजेच तुमची वेबसाईट ही रिस्पॉन्सिव्ह असली पाहिजे जेणेकरून तुमची सेवा आणि उत्पादनांची माहिती ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. दुसरे महत्त्वाचे म्हणजे त्यामध्ये कॉल टू ॲक्शन स्पष्ट असायला हवे. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे एखाद्या ग्राहकाने कोणत्या उद्देशाने तुमच्या वेबसाईटला भेट द्यावी असे तुम्हाला वाटतं ती ॲक्शन किंवा त्याबद्दलचे स्पष्टता वेबसाईटवर असावी.

जसं की यामध्ये तुम्हाला संपर्क करावा किंवा ऑर्डर प्लेस करावी किंवा इन्क्वायरी फॉर्म भरून पाठवावा इत्यादी बद्दलची स्पष्टता असावी. तसेच तुमची सविस्तर माहिती या वेबसाईट मध्ये असणे गरजेचे आहे व ग्राहकांची वारंवार जोडलेले राहण्यासाठी वेबसाईट व्यतिरिक्त तुम्ही ब्लॉग तसेच सोशल मीडिया आणि व्हाट्सअप इंटिग्रेट केलेले असणे गरजेचे आहे.

4- सोशल मीडियाचा कौशल्यपूर्ण वापर- ग्राहक तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे असतात व त्यांच्याशी तुम्ही कायम कनेक्ट राहावे याकरिता विविध प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणे गरजेचे आहे. तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या व्यवसाय संबंधित महत्त्वाच्या अशा कंटेंट पोस्ट करणे गरजेचे आहे व त्यामुळे तुम्ही ग्राहकांना आकर्षित करू शकाल.

तसेच गुगल सारख्या सर्च इंजिनमध्ये ऑप्टिमायझेशन ही सुद्धा एक महत्त्वाची प्रक्रिया असून ते देखील करणे गरजेचे आहे. आपल्याला माहित आहे की कुणालाही काही गोष्ट शोधायची असेल तर तो सर्वप्रथम गुगलला जातो व गुगलला गेल्यावर जर सगळ्यात अगोदर पंधरा ते वीस मध्ये तुम्ही दिसत असाल तर तो तुमच्याकडे येईल व ऑटोमॅटिक तुमचा बिजनेस वाढेल.

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन म्हणजे गुगल सारख्या सर्च इंजिनवर तुमचा व्यवसाय किंवा तुमची वेबसाईट पहिल्या पानावर दिसण्यासाठी जी तांत्रिक प्रक्रिया करणे गरजेचे असते त्याला म्हणतात. यासाठी या क्षेत्रातले तज्ञ तुम्हाला मदत करू शकतात.

5- ग्राहकांना दर्जेदार आणि उत्तम सेवा देण्यावर भर द्या- तुम्ही एखादे उत्पादन तयार करत आहात किंवा एखादी सेवा देत आहात तर या माध्यमातून तुमच्या ग्राहकाला अशा प्रकारची सेवा द्यावी की त्याला कधी तुमच्या व्यतिरिक्त दुसरीकडे जाण्याची गरजच पडणार नाही.

जेणेकरून तुमच्या व्यवसायातील दर्जेदारपणा आणि कॉलिटी बघून इतर लोक तुमच्याकडे येतील अशा पद्धतीने नियोजन करावे. तसेच ग्राहकांकडून फीडबॅक घेण्याची प्रणाली विकसित करावी.

ग्राहकांकडून जर फीडबॅक मिळत गेला तर तुम्हाला त्यानुसार तुमच्या प्रॉडक्ट किंवा सेवेमध्ये सुधारणा करता येते. गुगल सारख्या सर्च इंजिनवर जर लोकांनी तुमच्या व्यवसाय बद्दल चांगले रिव्ह्यू दिले तर तुमच्याकडे ऑटोमॅटिक ग्राहक मोठ्या प्रमाणावर येतील.

6- त्रुटी असतील तर सुधारण्यावर भर द्या- तुमचे व्यावसायिक ऑपरेशन किंवा उत्पादनामध्ये काही त्रुटी असतील तर ते शोधून काढा आणि ते कशा सुधारता येतील यावर भर द्या. सतत सुधारणा करत गेलात तर उत्तम असिस्टंट किंवा कार्यप्रणाली विकसित होते व याचा देखील नक्कीच फायदा होतो.

विविध तंत्रज्ञान तसेच सॉफ्टवेअर व एप्लीकेशनची मदत घ्या व जेणेकरून कामाची पद्धत तुम्हाला या माध्यमातून सुधारता येईल व कामाला गती देता येईल.

7- उत्पादन आणि सेवेमध्ये नाविन्यपणा आणा- नवीन उत्पादने किंवा सेवा आणल्यामुळे नवीन ग्राहक आकर्षित होऊ शकतात. त्यामुळे बाजारपेठेचा अभ्यास करून नवनवीन उत्पादने व सेवा लोकांसमोर कायम घेऊन या. परंतु असे करताना उत्पादने किंवा सेवेमध्ये मात्र कुठल्याही प्रकारची तडजोड करू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe