अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी कोरोनामुळे सणउत्सवावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वच सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान याच अनुषंगाने अनेक धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या विनंतीनुसार गावकर्यांच्या सहमतीने
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील येत्या 26 ऑक्टोबर रोजी होत असलेल्या ऐतिहासिक पारंपरिक पालखी सोहळा रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मांडवगण येथे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गावातील प्रमुख देवस्थानचे विश्वस्त तसेच पालखी मिरवणारे सेवक यांच्यासह पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीत एकमाताने हा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी सोहळ्याच्या निमित्ताने बाहेरील लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी जमतात. परंतु अशा सोहळ्यांमध्ये नागरिक सामाजिक अंतर पाळत नाहीत.
आणि कदाचित त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त करून गावकर्यांनी पालखी सोहळा रद्द करावा अशी प्रशासनाच्यावतीने विनंती केली. त्यास गावकर्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पालखी सोहळा साजरा करणार नसल्याचे सहमतीने सांगितले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved