घनश्याम शेलार शिवसेनेकडून लोकसभा लढविणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- लोकसभेच्या निवडणुकीत आता घराणेशाही सुरू झाली आहे. स्वयंभू नेते तयार होऊन ते उमेदवारीबाबत स्वतःच घोषणा करू लागले आहेत. आतापर्यंत जे लोकसभेत निवडून गेले, त्यांनी विकास केला नाही, तसेच कोणतीही योजना पूर्णत्वाला नेली नाही.

आता तर दिवाळीला मिठाई देण्याची नवी परंपराही सुरू झाली आहे, अशी टीका शिवसेनेचे समन्वयक घनश्याम शेलार यांनी काँग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्यावर करतानाच शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.

नगरमध्ये शिवसेनेचे शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका स्पष्ट केली. या वेळी जिल्हाप्रमुख (दक्षिण) शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगर पंचायत समिती सभापती रामदास भोर, भगवान फुलसौंदर, गिरीश जाधव आदी उपस्थित होते.

शेलार म्हणाले, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिवसेना स्वबळावर लढणार असा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा त्याची तयारी सुरू केली आहे. मला निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाले आहेत.

पण सध्या स्वयंभू नेते तयार झालेले आहेत. मीच लोकसभेचा उमेदवार आहे, मीच निवडणूक लढणार, निवडणूक हरलो, तर राजकारण करणार नाही, असे वक्तव्य करून गावोगाव सध्या टाहो फोडू लागले आहेत.याअगोदरही लोकसभेच्या निवडणुका झाल्या.

मात्र, त्या वेळेला मिठाई वाटली गेली नाही. त्यांना अगोदर कधीच दिवाळी दिसली नाही का? असा सवाल करत या वेळी उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून डॉ. सुजय विखे यांनी याच मतदारसंघांत मिठाई वाटली, हे कशाचे द्योतक आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment