अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या निधनानंतर सावरलेल्या स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिकांनमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे
सेनेच्या सदस्य नोंदणी अभियान बैठकीतच जिल्हा उपप्रमुख आनंद लहामगे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली.
गुलमोहर रोड परिसरातील कोहिनुर मंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी लहामगे यांनी युवासेनेचे रवींद्र वाकळे यांच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
उपनेते राठोड यांच्या निधनानंतर सावरलेल्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी काही दिवसांपूर्वीच एकजूट दाखवत पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला.
मात्र, रविवारी कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानात हा निर्धार पुन्हा गळून पडला. याच बैठकीत सेनेचे जिल्हा उपप्रमुख लहामगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
सभासद नोंदणी अभियानात भाषणे सुरू असताना रवींद्र वाकळे यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचे भाषण झाल्यानंतर लहामगे
यांनी वाकळे यांच्या विचारांशी सहमत असल्याचा चिमटा काढला. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक योगीराज गाडे, अनिल बोरुडे, मदन आढाव आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved