पुणे: गुरुवारी पहाटेच्या वेळी रस्त्यावर दारू पिऊन गोंधळ करणाऱ्या तरुणीला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मद्यधुंद तरुणीला अटक केली असून, सोनल सुनिल सद्रे (३०,रा. सद्रेवाडा भराड गल्ली अहमदनगर) असे तिचे नाव आहे. तरुणीला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

एक तरुणी ज्ञानेश्वर पादुका चौकात दारुच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या वेळी पोलिसांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केल असता तिने पोलिसांनाच शिवीगाळ करून मारहाण केली.
- काय सांगता ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘ह्या’ धबधब्यावर झालंय सलमान खानच्या सुपरहिट गाण्याच शूटिंग, कोणता आहे हा धबधबा?
- तृप्ती देसाईंच्या आरोपांनंतर भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी देसाईंच्या विरोधात बदनामीचा गुन्हा केला दाखल!
- शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतरही पुणतांबा येथे विद्यार्थ्यांना वेळेवर बससेवा उपलब्ध होत नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक, बससेवा सुरू करण्याची मागणी
- अहिल्यानगरमध्ये शासकीय अनुदानातून सोलर पंप मिळवून देण्याचे आमिष दाखवणाऱ्या भामट्याला राहुरी पोलिसांनी पडकलं, पाच दिवसाची पोलीस कोठडी
- साईबाबा संस्थानची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार !