अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून कणकण आणि थोडासा ताप जाणवत होता.
त्यामुळे त्यांना कोरोनाची चाचणी केली होती. त्याच्या या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सुरुवातीला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला होता, मात्र पुन्हा त्यांची स्वॅब चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
‘टाईम्स ऑफ इंडिया’ आणि ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रांनी यासंदर्भात वृत्त दिलं आहे. अजित पवारांनी शनिवारी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.
अजित पवारांनी शनिवारी सकाळी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
पुरामुळे बाधित झालेले रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामे तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देत, शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अजित पवार हा दौरा आटोपून परतल्यानंतर, त्यांना कणकण जाणवत होती. त्याशिवाय त्यांना तापही आला. त्यामुळे त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती.
त्यातील एका चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आणखी एक चाचणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved