अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांनी आपल्या आईच्या दशक्रिया विधीत वृक्षरोपण करुन गावात पर्यावरण जागृतीसाठी नवा पायंडा पाडला.
गावातील अमरधाम परिसरात विविध प्रकारच्या झाडांची लागवड करुन त्याच्या संवर्धनाची जबाबदारी देखील डोंगरे परिवाराने स्विकारली. नुकतेच आदर्श माता द्रौपदा किसन डोंगरे यांचे निधन झाले. पर्यावरणाचा र्हास थांबवण्याचा प्रयत्नाचा एक भाग म्हणून त्यांच्या दशक्रीया विधीच्या दिवशी डोंगरे परिवाराच्या वतीने वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे, ह.भ.प. सुभाष महाराज सुर्यवंशी, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर, ह.भ.प. रामदास महाराज शेंडे, तुळशीराम महाराज लबडे, संजय महाराज कांडेकर, प्रवचनकार डॉ. सुनिल गंधे, पै.वसंत पवार, बाळासाहेब शहाणे, माजी सरपंच साहेबराव बोडखे,
खंडेश्वर देवस्थानचे नामदेव गुंजाळ, आबापाटील सोनवणे, दत्तात्रय पवार, डॉ. आव्हाड, डॉ. संतोष गुंजाळ, सिनेकलाकार मोहनीराज गटणे, सुरेश खामकर, कल्याण ठोंबरे, रामदास अडसुरे, आनंद शेळके, मच्छिंद्र कुलट, किसनराव वाबळे, पादीर गुरुजी, बंटी गुंजाळ, पठारे सर, बाबासाहेब कांडेकर, काशीनाथ पळसकर, चंद्रकांत पवार,
उत्तम कांडेकर, भाऊसाठेब ठाणगे, अनिल ब्राम्हणे, बाबासाहेब महापुरे, गणेश जाधव, संजय जपकर. गोकुळ जाधव, उपसरपंच बबन नाट, अण्णा जाधव आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. माधवराव लामखडे म्हणाले की, पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे, त्याकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.
त्यादृष्टीने हे टाकलेले पाऊल आहे. इतरांनीही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न करावेत. असा या आगळ्या वेगळ्या उपक्रमातून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्याचा प्रयत्न डोंगरे परिवाराने केला असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुनिल गंधे यांनी जीवन चक्रानुसार मरण अटळ आहे.
पण घरातील व्यक्ती गेल्यानंतर त्या व्यक्तीच्या आठवणी कायम स्मरणात राहण्यासाठी वृक्षरोपण हा सर्वोत्तम पर्याय आहे. या झाडांचा उपयोग निसर्गासाठी व प्रत्येक मनुष्याला ऑक्सीजन देण्यासाठी होणार आहे.
मनुष्याने देखील जीवन जगत असताना सामाजिक भावना ठेऊन इतरांसाठी कार्य केल्यास मरणानंतर देखील तो त्याच्या कार्याने नेहमीच जिवंत राहत असल्याचे त्यांनी स्पष्ट करुन, नाना डोंगरे यांनी आई-वडिलांच्या प्रेरणेने उभे केलेल्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved