गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी केले जेरबंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही वर्षांत नगरची चर्चा काही ना काही कारणांमुळे राज्यभर होते आहे. त्यात बहुतांश वेळी गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनांचा समावेश आहे.

यामध्येच जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी प्रवृत्ती पोलिसांसाठी त्रासदायक ठरत आहे. गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे स्वतःजवळ बाळगल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी संगमनेर खुर्द परिसरात रायतेवाडी फाट्यावर दोघांना बुधवारी (दि. 21) रोजी रात्री साडे नऊ च्या सुमारास अटक केली आहे.

पृथ्वीराज उर्फ देवा आबासाहेब देशमुख (वय 22) आणि किरण विजय दळवी (वय 24) ( दोघे रा. शिरसगाव ता. नेवासा)असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

या गोघा आरोपींकडून एक गावठी बनावटीचा पांढऱ्या धातूचा पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, एक प्लॅटिना कंपनीची विना नंबरची दुचाकी, आणि दोन मोबाईल फोन असा सुमारे एक लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान पोलिसांनी सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. ए. माळी हे करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment