गुटखा प्रकरणातील मुख्य आरोपीला जामीन मंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुटखा तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. वाढत्या घटनांना रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक कारवाई करत आहे.

यातच नगर शहरातील हल्लीच घडलेली एक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. शहरामध्ये विक्री होत असलेल्या गुटख्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करणाऱ्या तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आला होता.

या हल्लात तरुण जखमी झाला होता. त्यांनी दिलेल्या फिर्यादी वरून तोफखाना पोलीस ठाण्यात एहसान कासम शेख आणि त्याच्या चार साथीदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र या प्रकरणात यातील मुख्य आरोपी एहसान कासम शेख यास एकाच दिवसात जामीन मंजूर झाला आहे. तर उवरित 04 आरोपी फरार आहे आरोपी शहरात गुटखा विक्री करतअसल्याने त्यावर सुद्धा कारवाई झाली होती.

याचाच राग मनात धरून आरोपीने हा हल्ला केला होता. या प्राणघातक हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला आहे. सध्या फिर्यादीवर रुग्णलयात उपचार सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक घायवत करत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment