अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- मोहटादेवीच्या दर्शनाहुन परतत असताना आयटीआय इमारती जवळ मोहटादेवी -पाथर्डी रस्त्यावर पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी मोटारसायकल वरील तिघेजण पडले.
रात्री दोन वाज्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यामधील गंभीर जखमी असलेल्या राजेंद्र राख रा. शेवगाव याला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
सकाळी पोलिसांना माहीती मिळाली की मोटारसायकल वर तिघेजण होते आणि एकजण जखमी असुन दोन जण बेपत्ता आहेत. पोलिसांनी शेजारच्या नदीत तपास केला असता दोघाचे मृतदेह पाण्यात सापडले आहेत.
आनंद संजय जगधने व दिपक रामभाऊ धोत्रे दोघे रा. शेवगाव असे मयताची नावे आहेत. पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.
अपघातस्थळी मोटारसायकल मिळाली आहे. रस्त्याचे काम सुरु आहे. मात्र येथे ठेकेदाराने कोणतेही फलक लावलेली नाही.तसेच बाजुने काढुन दिलेला रस्ताही खड्यांचा आहे.
अपघामधे मयत झालेल्या भाविकांच्या मृत्युला जबाबदार धरुन संबधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे.
शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, राजेंद्र राख बेसुद्ध अवस्थेत असल्याने लोकांनी त्याला दवाखान्यात नेले. मात्र त्याच्या सोबत आणखी दोघेजण होते हे रात्री समजले नाही.
सकाळी पोलिसांनी माहीती मिळाली त्यानंतर शोध घेतला गेला. रस्त्याच्या कामामुळे आणखी किती लोकांचा बळी जाणार हे सांगता येत नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved