साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी खाली; पगाराविना उपासमारीची ओढवली वेळ

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,23 ऑक्टोबर 2020 :- आपले संकटे दूर व्हावे व धन संपत्ती, शांती लाभो यासाठी देशभरातून भाविक शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी नतमस्तक होतात.

साईंच्या कृपेने प्रत्येकाच्या झोळीत आशीर्वादाची शिदोरी त्यांना मिळते. मात्र अशाच शिर्डीतील साईंच्या दरबारातील कर्मचाऱ्यांची झोळी सध्याच्या स्थितीला खाली आहे.

तसेच गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना पगार सुद्धा झाला नाही़. काम करून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून साई संस्थानच्या ५९८ कायम कंत्राटी कामगारांच्या विषय अनेकदा चर्चेला येऊनही निर्णय होऊ शकला नाही़.

दरम्यान २७ ऑक्टोबरच्या बैठकीत पगाराचा विषय चर्चेला घेतला जाण्याची शक्यता आहे. शहर स्वच्छतेसाठी नगरपंचायतीला निधी देण्याचा निर्णय संस्थानच्या गेल्या व्यवस्थापनाने घेतला आहे.

यासाठी शासनानेही मान्यता दिली आहे. चार महिन्यांपासून हा निधी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शहराच्या स्वच्छतेवर परिणाम झाला आहे.

साधनसामग्री व मनुष्यबळात कपात करण्यात आली आहे. स्वच्छता कामगारांचे कामाचे दिवस कमी करण्याबरोबरच चाळीस टक्के पगार कपात करण्यात येत आहे.

यामुळे कामगारांना पाच हजाराच्या आसपास पगार मिळणार आहे. व्यवस्थापन व प्रशासनात एकवाक्यता नसल्याने बैठकीचे निर्णय कायम होण्यातही विलंब होत आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment