अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात मोठ्या बदलांची तयारी सुरू आहे. यामुळे आता तुम्हाला 5000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढताना अडचण येऊ शकते.
गेल्या 8 वर्षांपासून एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात फारसा बदल झालेला नाही. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली असून,
एटीएमशी संबंधित नियमात बदल करण्याची शिफारस केली आहे. आता समितीच्या शिफारशीवर आरबीआय पुढील कार्यवाही करेल. एका माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे.
एटीएमशी संबंधित शुल्कात काय बदल होऊ शकतात ते जाणून घ्या :- आतापर्यंत बँका सर्वसाधारणपणे महिन्याकाठी 5 वेळा खातेदाराला विनामूल्य रोख किंवा विना-रोख व्यवहार देतात.
पैसे काढण्यास कोणतीही मर्यादा नाही. पण आता एटीएममधून 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढवण्यावर शुल्क घेण्याची तयारी आहे. हे अतिरिक्त शुल्क असेल.
शुल्क किती असू शकते ते जाणून घ्या :- मिळालेल्या माहितीनुसार, खातेदारांना एटीएममधून 5000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम काढण्यासाठी आता 24 रुपये अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते.
सध्या एका महिन्यात 5 विनामूल्य व्यवहारानंतर पुढच्या वेळी एटीएमवर 20 रुपये शुल्क आकारले जाते. अशा प्रकारे ही फी जास्त असेल.
आरबीआय समितीची शिफारस काय आहे ते जाणून घ्या :- एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एक समिती स्थापन केली होती,
ज्या शिफारसींच्या आधारे हा बदल तयार केला जात आहे. परंतु, समितीचा अहवाल आरबीआयने अद्याप जाहीर केलेला नाही. माहिती अधिकार कायद्यांतर्गत (आरटीआय) माहिती मागितली असता ही माहिती मिळाली आहे.
ही समिती कधी स्थापन झाली ? :- एटीएम शुल्काचा आढावा घेण्यासाठी आरबीआयने गठीत केलेल्या समितीने आपल्या शिफारसी सादर केल्या आहेत.
याच्या आधारे बँका 8 वर्षानंतर एटीएम फी बदलू शकतात. माहिती अधिकारात दिलेल्या माहितीनुसार आरबीआय समितीने एटीएममधून पैसे काढण्याची सवय कमी करण्याचे सुचविले.
हा अहवाल 22 ऑक्टोबर 2019 रोजी आरबीआयकडे सादर करण्यात आला होता. तथापि, आरबीआयने अद्याप हे जाहीर केले नाही. परंतु एका आरटीआय उत्तरात ही माहिती दिली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved