Gold Rate : सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी अर्थातच सहा मे 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार 250 रुपये प्रति दहा ग्राम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 98 हजार 407 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती.
त्यानंतर सलग दोन दिवस किंमत वाढत राहिली, आठ मे रोजी 24 कॅरेट सोन्याची किंमत 99 हजार 600 रुपये प्रति दहा ग्राम एवढी होती. यानंतर 12 मे 2025 रोजी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.

या दिवशी सोने 3220 रुपयांनी स्वस्त झाले. या दिवशी 24 कॅरेट सोन्याची किंमत 95 हजार 460 रुपये प्रति दहा ग्रॅम एवढी होती. दरम्यान काल अर्थातच 14 मे 2025 रोजी किमतीत 540 रुपयांची घसरण झाली.
महत्वाची बाब म्हणजे आजही घसरणीचा ट्रेंड कायम आहे. अशा परिस्थितीत आज आपण 15 मे 2025 रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किमती कशा आहेत याचा आढावा घेणार आहोत.
14 मे 2025 रोजीच्या सोन्याच्या किमती
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 90 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.
आजच्या सोन्याच्या किंमती
मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, कोल्हापूर, जळगाव : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 30 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 50 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 40 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.
नाशिक, लातूर, वसई विरार, भिवंडी : 18 कॅरेट सोन्याची किंमत 72 हजार 60 रुपये प्रति दहा ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याची किंमत 96 हजार 80 रुपये प्रति दहा ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी राहिली.