अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक या पावसामुळे अक्षरश वाया गेले आहे.
या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी नूतन जिल्हाधिकारी यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची पाहणी केली.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी रविवारी (दि. २४) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या संगमनेर तालुक्यातील पिकांची पाहणी केली. चंदनापुरी व पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील शेतक-यांशी त्यांनी संवाद साधला.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण व्हावेत.
तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे गतीने पूर्ण करावेत. याकरिता तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी परस्पर समन्वय ठेवून काम करावे.
अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई शेतकऱ्यास मिळावी, यासाठी सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी भोसले यांनी केल्या.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













