Post Office FD Scheme : आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील बहुतांशी बँकांकडून एफडीच्या व्याजदरात कपात करण्यात आली आहे. मात्र पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनेचे व्याजदर आरबीआयच्या रेपो रेट मधील कपाती नंतर सुद्धा कायम आहेत.
यामुळे जर तुम्हाला सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस ची एफडी योजना फायद्याची ठरणार आहे. म्हणून आज आपण पोस्टाच्या एफडी योजनेची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे पोस्ट ऑफिसची एफडी योजना?
सुरक्षित आणि चांगला दमदार व्याजदर या गोष्टी विचारात घेता पोस्ट ऑफिसच्या फिक्स डिपॉझिट योजनेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. पोस्टाच्या टाईम डिपॉझिट योजनेला फिक्स डिपॉझिट म्हणून ओळखले जाते.
खरेतर, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्षे आणि पाच वर्ष कालावधीची एफडी योजना ऑफर केली जात आहे. यातील एका वर्षाच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.9% व्याजदराने व्याज दिले जात आहे.
तसेच दोन वर्षांच्या एफडी योजनेत, तीन वर्षांच्या एफडी योजनेत आणि पाच वर्षांच्या एकटी योजनेत अनुक्रमे सात टक्के, 7.10 टक्के आणि 7.50% दराने व्याज दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आता आपण पोस्टाच्या 3 वर्षांच्या FD योजनेत जर एक लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर किती व्याज मिळणार याचे कॅल्क्युलेशन पाहणार आहोत.
3 वर्षात मालामाल बनवणार पोस्टाची FD योजना
सध्या पोस्ट ऑफिसकडून 3 वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बँकांच्या एफडी योजनांच्या तुलनेत अधिक व्याज दिले जात आहे. यात गुंतवणूक करणाऱ्यांना 7.10% दराने व्याज दिले जाते.
पोस्ट ऑफिसच्या एफडी कॅल्क्युलेटरनुसार, जर समजा 3 वर्षांच्या एफडी योजनेत एखाद्याने 1 लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 7.10% दराने मॅच्युरिटीवर एक मोठी रक्कम मिळणार आहे.
एका लाखाच्या गुंतवणुकीवर तीन वर्षांचा काळ पूर्ण झाल्यानंतर एक लाख 23 हजार 508 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच गुंतवणूकदाराला व्याज म्हणून पोस्टाकडून 23,508 रुपये मिळणार आहेत.