Vande Bharat Express : भारतीय रेल्वे कडून लवकरच पुणे ते नागपूर दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू केली जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली. खरे तर वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील संपूर्ण स्वदेशी बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड ट्रेन.
ही गाडी सुरुवातीला देशातील नवी दिल्ली ते वाराणसी या महत्त्वाच्या मार्गावर धावली आणि यानंतर टप्प्याटप्प्याने इतर महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू झाले. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर सध्या ही गाडी राज्यातील 11 महत्वाच्या मार्गावर सुरु आहे.

ही गाडी राज्यातील CSMT ते सोलापूर, CSMT ते शिर्डी, CSMT ते जालना, CSMT ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, नागपूर ते बिलासपुर नागपूर ते इंदोर नागपूर ते सिकंदराबाद पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर धावते.
महत्त्वाची बाब अशी की लवकरच पुणे ते नागपूर या मार्गावर देखील वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
अशातच आता रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे गोरखपूर आणि पाटणा या दोन शहरांना जोडण्यासाठी लवकरच एक वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे.
ही वंदे भारत ट्रेन प्रवाशांचा प्रवासाचा वेळ 5 तासांपर्यंत कमी करेल आणि दोन प्रमुख शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वेगवान, आरामदायी आणि परवडणारा रेल्वे प्रवास उपलब्ध होणार आहे.
जवळजवळ 500 किलोमीटर अंतर कापणारी, नवीन वंदे भारत एक्सप्रेस गोरखपूर येथून सुरू होईल, मुझफ्फरपूर येथे थांबेल आणि पटनापर्यंत धावणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्व मध्य रेल्वेने ही योजना प्रस्तावित केली आहे, जी ईशान्य रेल्वेकडून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान आता आपण या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार नव्या वंदे भारत ट्रेन चे वेळापत्रक?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही ट्रेन गोरखपूरहून सकाळी 6 वाजता निघणार आहे आणि मुझफ्फरपूरला सकाळी 10 वाजता थांबेल आणि पटनाला त्यानंतर एक तासांनी म्हणजे सकाळी 11 वाजता पोहोचणार आहे. यामुळे दोन राज्यांमधील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.
तिकीट दर कसे असतील?
वंदे भारत ट्रेन ने गोरखपुर ते पटना हा प्रवास करायचा झाल्यास सहाशे रुपये इतके तिकीट राहणार आहे. तसेच मुजफ्फरपुर ते गोरखपुर या प्रवासासाठी 480 रुपये लागणार आहेत.
तथापि अजून तिकीट दराबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या गाडीचे तिकीट दर कसे असणार हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे. शिवाय ही गाडी कधीपर्यंत प्रवाशांच्या सेवेतील हे सुद्धा पाहणे औत्सुकत्याचे ठरणार आहे.