अहमदनगर Live24 टीम,27 ऑक्टोबर 2020 :- नगर शहरातील मालमत्ताधारकांची शास्ती माफ करावी, या मागणीसाठी मनपातील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मंगळवारी मनपात आंदोलन करणार आहे.
थकबाकीचा आकडा सुमारे दोनशे कोटी असून त्यात शास्ती समाविष्ट आहे. बारस्कर यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, कोरोनामुळे अनेक कंपन्या बंद पडल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली.
आर्थिक परिस्थितीमुळे अनेकजण घरपट्टी व पाणीपट्टी भरू शकत नाहीत. त्यामुळे शास्ती माफ केल्यास नागरिक कर भरतील.
मनपाने शास्तीमाफी करून नागरिकांना दिलासा द्यावा; अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापालिकेत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बारस्कर यांनी दिला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved