बजाज फेस्टिव्ह ऑफर ; पल्सरच्या ‘ह्या’ मॉडेल्सवर मिळतोय मोठा कॅशबॅक

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- फेस्टिव सीजनमध्ये दुचाकी कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर देत आहेत. दिवाळीपूर्वी बजाज ऑटोने सर्वात लोकप्रिय बाईक पल्सरवर आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या आहेत. कंपनीने ही ऑफर पल्सर 125 च्या तीन वेरिएंट वर लागू केली आहे. या ऑफरबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात-

 10 टक्के कॅशबॅक :- जर या बाइक्स खरेदी करताना ग्राहक पेटीएमद्वारे पैसे भरत असेल तर त्यांना 5000 रुपये कॅशबॅक मिळेल. ग्राहकाने जर बँक ऑफ बडोदाच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे भरले तर त्यांना 10 टक्के कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर ग्राहकांना सिटी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे देय दिल्यास 5 टक्के कॅशबॅक मिळेल.

त्याशिवाय ग्राहक पल्सर 125 चे तिन्ही वेरिएंट 8,580 रुपयांच्या डाउन पेमेंटवर 6.99 टक्के व्याजदरावर आपल्या घरी घेऊन जाऊ शकतात.

पल्सरच्या ‘ह्या’ मॉडेलवर मिळेल सूट

  • – १) पल्सर 125 स्प्लिट- पल्सर 125 स्प्लिट सीटची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 73,274 रुपये आहे. ज्यावर कंपनी 3 हजार रुपयांची सूट देत आहे. अशा परिस्थितीत या बाईकची किंमत फक्त 70,274 रुपये असेल.
  • २) पल्सर 125 सिंगल सीट- दिल्लीत पल्सर 125 सिंगल सीटची एक्स-शोरूम किंमत 72,122 आहे जी तुम्ही 69,622 मध्ये घरी घेऊ शकता. आपल्याला ही बाईक खरेदी केल्यास 2500 रुपयांचा फायदा मिळेल.
  • ३) पल्सर 125 डिंस्क वेरिएंट्स- दिल्लीतील या व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत, 76,922 रु. आहे जी तुम्ही 74922 मध्ये खरेदी करू शकता. आपल्याला ही बाईक खरेदी करून 2000 हजार रुपये फायदा मिळेल.

फेस्‍ट‍िव सीजनमधेच ऑफर:- बजाज ऑटोची ही ऑफर या महिन्यापर्यंत म्हणजे 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत आहे. या व्यतिरिक्त, कंपनी कमी डाउन पेमेंटवर इतर मोटारसायकलीही देत आहे. व्हेरिएंटनुसार डाउन पेमेंटमध्येही फरक असू शकतो. अधिक माहितीसाठी, आपण आपल्या जवळच्या डीलरशिपवर जाऊन ऑफरबद्दल माहिती देखील मिळवू शकता.

 फ्रीमध्ये मिळेल 2000 रुपयांपर्यंतची एक्सेसरी दुसरीकडे,:-  यामाहाने ग्राहकांसाठी फ्री ब्रांडेड एक्सेसरीचा फेस्टिव्ह ऑफर आणली आहे. याअंतर्गत यामाहाच्या 125 सीसी स्कूटरच्या बुकिंगवर ग्राहकास 2000 रुपयांची ब्रांडेड एक्सेसरी मिळेल. कंपनीची ऑफर यामाहा फॅसिनो 125, रेझेडआर 125 आणि रेझेडआर स्ट्रीट रॅली 125 स्कूटरवर मिळेल.

यामाहाकडे भारतात त्याच्या पोर्टफोलिओमध्ये फक्त 125 सीसी स्कूटर आहेत. यामाहाची विनामूल्य ब्रांडेड एक्सेसरी योजना केवळ दिल्लीतच लागू आहे, संपूर्ण भारतात ती मिळू शकत नाही. ही मर्यादित कालावधीची योजना आहे. कंपनीने आपली अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी ही ऑफर सणासुदीच्या हंगामाच्या अखेरपर्यंत चालेल अशी अपेक्षा आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment