अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- गेट-टुगेदरच्या नावाखाली राहुरीतील तरुणीला मुंबईत बोलावून तिच्यावर ११ जानेवारी ते १७ जुलै या कालावधीत वेळोवेळी बलात्कार करण्यात आला.
तरूणीच्या फिर्यादीवरून विनायक तडसे (नवी मुंबई) याच्यावर राहुरी पोलिसांनी बुधवारी रात्री बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तालुक्यातील एका महाविद्यालयात ही तरुणी शिक्षण घेते. विनायकने तिला गेट-टुगेदरसाठी बोलावून घेतले.

तिचे नको त्या अवस्थेत फोटो काढून हा प्रकार कोणाला सांगितल्यास फोटो व्हायरल करण्याची व जीवे ठार मारण्याची धमकी त्याने दिली. तपास पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल करत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved