विहिरीतील ‘ती’ पिल्ले बिबट्याची नव्हे; गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सध्या बिबट्याने धहसाहत माजवली आहे. अनेक ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.

यातच जामखेड तालुक्यात बिबट्याविषयी एक अफवा पसरली यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरलं होत. याबाबत माहिती अशी कि,

जामखेड तालुक्यातील हळगाव येथील एका विहिरीत बिबट्याचे दोन पिल्ले असल्याची खबर गुरूवारी सायंकाळी सोशल मीडियावर वायरल झाली. अन् परिसरातील मोठी खळबळ उडाली होती.

या घटनेची खबर तातडीने वनविभागाच्या अधिका-यांना देण्यात आली वन कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन विहिरीतील जंगली प्राण्यांची पाहणी केल्यानंतर ते पिल्ले बिबट्याचे नसल्याचे स्पष्ट झाले.

अन् सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. दरम्यान गेल्या आठवडाभरापासून पाथर्डी तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना उघडकीस आल्याने जनतेत भीती आहे.

त्यात ही बातमी समोर आल्याने हळगाव परिसरात मोठी भीती पसरली होती. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सदर विहिरीची पाहणी केली व हे पिल्ले बिबट्याचे नसून उदमांजराचे असल्याचे निदर्शनास आले.

अन् नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, शुक्रवारी विहिरीत पडलेल्या उदमांजरांच्या दोन पिल्लांना वनविभागाकडून सकाळी यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment