अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कांद्याच्या दराने उच्चांकी गाठली होती. त्यातच केंद्राकडून देशात कांदा निर्यात बंदी लावण्यात आली होती.
यामुळे कांद्याच्या भावांमध्ये चांगलाच चढउतार झालेला पाहायला मिळाला होता. दरम्यान रॉकेटच्या गतीने उच्चांकी गेलेल्या कांद्याच्या भावामध्ये घसरण सुरु झाली आहे.
भाव अजून वाढण्याची चिन्हे असताना दसऱ्याला अचानक कांद्याचे भाव गडगडले. भाव वाढत असल्याने सरकारने कमी करण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध आणले.
त्यामुळे नाशिक येथील बाजारात लिलाव झाले नाहीत. त्याचा परिणाम नगरसह अन्य जिल्ह्यातील कांद्याच्या दरावर झाले. सरकारने विदेशातून कांदा आयात केला.
मात्र आयात केलेल्या बेचव कांद्याकडे ग्राझकानी पाठ फिरवली. त्यामुळे कांदा आयात होऊन दर वाढत होते. त्यामुळे सरकारने कांद्याच्या साठेबाजीवर निर्बंध आणत २५ टनाहून अधिकचा साठा असलेल्या चाळींवर कारवाई केली.
राज्यातील सर्वात मोठे नाशिक मार्केट यामुळे तीन दिवस बंद होते. सरकारच्या साठेबाजीच्या धोरणामुळे कांदा व्यापारी हवालदिल आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कांदा मार्केट विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम दरावर होत आहेत.
त्यात मध्यप्रदेशमधील कांद्याची आवक मध्यंतरी सुरू झाली होती. ती आता बंद झाली असून, कांद्याचे भाव पुन्हा वाढतील. परंतु,
दिवाळी सण तोंडावर आल्याने कांद्याचे लिलावर काही दिवसांसाठी बंद राहतील. त्याचाही परिणाम कांदा लिलालावर होण्याची शक्यता आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved