बिबट्या त्याच्यावर झेपावला आणि त्याचा आवाजच बंद झाल

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याकडून मानवी वस्तीवर हल्ले वाढू लागले आहे.

यामुळे नागरी वस्तीमध्ये भीतीचे वातावरण वाढले आहे. यातच शिर्डीमध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला चढवत त्याचा फाडशा पाडला. दरम्यान हि धक्कादायक घटना काही मुलांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली.

याबाबत शेतकरी मधुकर वाणी म्हणाले, की हा बिबट्या गुरुवारी रात्री वस्तीवर आला होता. आम्ही त्याला पिटाळले. वस्तीवरील जनावरांच्या गोठ्याभोवती कुंपण आहे.

मात्र, त्याची नजर पाळीव कुत्र्यावर होती. आम्ही त्यावर नजर ठेऊन असताना काल रात्री दीडच्या सुमारास बिबट्या पुन्हा वस्तीकडे आला. आणि झाडाला बांधलेल्या कुत्र्याने बिबट्याला पाहताच भुकेने सुरु केले.

मात्र बिबट्या त्याच्यावर झेपावला आणि त्याचा आवाजच बंद झाला. बिबट्याने आपली शिकार फस्त केली. हे सर्व सुरु असताना तेथील एका घरातील मुलांनी खिडकीतून या घटनेचा व्हिडीओ बनविला.

साधारण 10 मिनिटांचा हा थरार वस्तीवरील मुलांच्या मोबाईलमध्ये कैद झाला. दरम्यान बिबट्याची वाढती दहशत पाहता वन खात्याने संबंधित परिसरात तातडीने पिंजरा लावणे आवश्‍यक आहे.

लहान मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भोवताली ऊस व पाणी असल्याने बिबट्याला चांगला निवारा मिळाला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved