अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीचा खून केला. गंगाबाई चव्हाण (वय ४२) असे मृत पत्नीचे नाव आहे. बद्रीनाथ चव्हाण असे आरोपीचे नाव आहे आहे.
राहुरी तालुक्यामधील वांबोरी परिसरातील कुक्कडवेढे येथे गंगाबाई बद्रीनाथ चव्हाण (वय ४२) ही महिला पाच ते सहा दिवसांपासून पती बद्रीनाथ चव्हाण आणि त्यांचा मुलगा ऊसतोडणीसाठी कुक्कडवेढे येथे आले होते.
या घटनेमधील आरोपी बद्रीनाथ चव्हाण हा व्यसनाधीन होता. दोन नोव्हेंबर रोजी बद्रीनाथ चव्हाण याने गंगाबाईकडे पैशाची मागणी केली होती.
मात्र पत्नीने पैसे दिले नाही. या गोष्टीचा राग आल्याने दोघांमध्ये भांडणे झाली. बद्रीनाथ चव्हाण याने डोक्यात दगड मारून गंगाबाईचा खून केला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved