अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०१ नवे रुग्ण आढळले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के झाले. नगर शहरात सर्वात कमी १८ रुग्ण आढळले.
मागील चार महिन्यांतील सर्वात कमी नोंद गुरुवारी झाली. रुग्णवाढीचा वेग मंदावला अाहे. यापूर्वी दररोज पाचशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. शहरातदेखील ३०० हून अधिक रुग्ण आढळून येत. गुरुवारी मात्र सर्वात कमी १८ रुग्णांची नोंद झाली.
२४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २५, खासगी प्रयोगशाळेत २७ आणि अँटीजेन चाचणीत १४९ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयात मनपा हद्दीतील ९, जामखेड ३, नगर ग्रामीण ३, नेवासे २, पाथर्डी १, संगमनेर १, श्रीगोंदे ३, मिलिटरी हॉस्पिटल १ आणि इतर जिल्ह्यांतील २ रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा ५, कोपरगाव १, नगर ग्रामीण १, नेवासे २, पाथर्डी २, राहाता २, राहुरी २, संगमनेर ५, शेवगाव २, श्रीरामपूर ४ आणि कॅन्टोन्मेंट १ रुग्णाचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा ४, अकोले १०, जामखेड ६, कर्जत १२, कोपरगाव ३, नगर ग्रामीण २, नेवासे ८, पारनेर ८, पाथर्डी १७, राहाता १६, राहुरी ८, संगमनेर २६, शेवगाव ११, श्रीगोंदे १, श्रीरामपूर १७ रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आतापर्यंत ८८३ जणांचा मृत्यू झाला आहे. ५७,३६७ रुग्ण आढळून आले. त्यापैकी ५५,१०९ रुग्ण बरे झाले आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved