अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही यादी राज्यपालांकडे सुपूर्द केली. परिवनह मंत्री अनिल परब, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,
अमित देशमुख यांनी राजभवनावर नुकतीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी तिन्ही मंत्र्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपालांकडे सादर केली.
विशेष म्हणजे राज्यपालांना देण्यात आलेल्या नावांचा कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. आता ही यादी राज्यपालांकडे आल्यानंतर राज्यपाल त्यावर कधीपर्यंत निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी यादी राज्यपालांना दिली आहे. मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि मंत्रिमंडळ ठराव यासह कायदेशीर बाबी नमूद करुन राज्यपालांना विनंती पत्र दिलं आहे.
सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करुन यादी सोपवली आहे, त्यामुळे राज्यपाल या यादीवर शिक्कामोर्तब करतील,” असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.
संभाव्य नावे ?
शिवसेना
- उर्मिला मातोंडकर
- चंद्रकांत रघुवंशी
- नितीन बानगुडे
- पाटील विजय करंजकर
राष्ट्रवादी
- एकनाथ खडसे
- राजू शेट्टी
- यशपाल भिंगे
- आनंद शिंदे
काँग्रेस
- रजनी पाटील
- सचिन सावंत
- मुझफ्फर हुसेन
- अनिरुद्ध वनकर
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved