अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ही तक्रार गोवा सुरक्षा मंचाकडून दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक धावत असतानाचा निर्वस्त्र फोटो शेअर केला होता.
याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन ६७ अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान अश्लिल व्हिडीओ चित्रीत केल्याप्रकरणी पूनम पांडेला अटक करण्यात आली होती.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved