कोरोनामुक्तीसाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंची महाप्रार्थना

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने संपुर्ण देशात थैमान घातले असताना यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. कोरोनाचे संकट टळण्यासाठी भिंगार, सदर बाजार येथील बौध्द विहारात सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक महाप्रार्थना करण्यात आली.

फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजी भिंगारदिवे, भारतीय बौध्द महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, डॉ. सिताताई भिंगारदिवे, उपक्रमाचे आयोजक आरपीआय आयटी सेलचे जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ,

दिपक अमृत, संजय भिंगारदिवे, आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, राहुल कांबळे, युवकचे शहराध्यक्ष अमित काळे, महिला आघाडीच्या आरती बडेकर, कॅन्टोमेंट सदस्या शाहीन शेख, शकुंतलाताई पानपाटील, विजय कांबळे, सचिन शिंदे, विवेक भिंगारदिवे, दिपक गायकवाड,

संतोष सारसर, मिथुन दामले, सचिन वाघमारे, मानस प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल बेलपवार आदी समाज बांधव आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित बौद्धाचार्य भन्ते सुमेधजी, उदासी महाराज, अल्ताफ मुफ्ती, फादर संजय घाटविसावे या सर्व धर्मगुरुंनी कोरोनामुक्तीसाठी विशेष प्रार्थना केली.

तसेच आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले कोरोनातून बरे होण्यासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. उपस्थितांनी देखील रामदास आठवले यांच्यासह अनेक कोरोनाशी संघर्ष करीत असून सर्वजन बरे होतील असा विश्‍वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धाचार्य दिपक अमृत यांनी केले. मंगेश मोकळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बौद्ध ज्येष्ठ नागरिक संघ, रमा फाउंडेशन, रमाई महिला मंडळ, मानस प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment