पदापेक्षाही समाजसेवेला नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचे प्राधान्य

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- नगर – समाजातील दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ केलेले कार्य हे सेवा कार्य असते. समाजातील वंचित घटकांना मदत करुन सर्वसामान्य लोकांना कायम मदतीचा हात दिल्याने समाजसेवेचे पद सुनिल त्र्यंबके यांना मिळाले म्हणून ते नगरसेवकपदापर्यंत पोहचले असले तरी या पदाला न्याय देत समाजसेवेचे व्रत जोपासत असल्याने त्यांना सर्वांची साथ मिळेल, असे प्रतिपादन जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी केले.

तपोवन रोडवरील जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनच्या माध्यमातून व्हॉलीबॉल ग्राऊंड उपलब्ध झाले, या मैदानाचा शुभारंभ नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांच्या हस्ते करण्यात आला. या फौंडेशनला वेळोवेळी त्र्यंबके यांनी भरीव मदत केल्याबद्दल त्यांचा तिरंगा ध्वज देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी श्री.पालवे बोलत होते. याप्रसंगी साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे, निवृत्ती भाबड, जगन्नाथ जावळे, संभाजी कराड, बन्सी दारकुंडे, गणेश पालवे, संजय पाटेकर, विठ्ठल लगड, बाबासाहेब भवर, बंडू पवार, सचिन दहिफळे आदि उपस्थित होते.

श्री.पालवे पुढे म्हणाले, तपोवन रोडवरील फौंडेशनच्या या जागेत वृक्षारोपण, स्मारक करण्यासाठी नगरसेवक त्र्यंबके यांनी सहकार्य केले. व्हॉलीबॉल ग्राऊंडचे उद्घाटन झाल्याने येथे मैदानी खेळ होतील. मैदानावरील खेळामुळे व्यायामाचा सराव होईल. या ठिकाणी हायमॅक्स बसविण्यासाठी त्र्यंबके यांनी पुढाकार घ्यावा, असे श्री.पालवे म्हणाले.

याप्रसंगी सुनिल त्र्यंबके म्हणाले की, साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी समाजसेवेचे व्रत साईबाबांच्या कृपेने स्विकारले ते अविरतपणे सुरु ठेवले.सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेमुळे नगरसेवकपद जरी मिळाले तरी समाजसेवेचे मोठे पद म्हणून हे काम सुरु राहिल.

नागरिकांच्या समस्या सोडविणे हे कर्तव्यच असल्याने ते काम आपण करीत राहणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी अंकुश भोस, अमोल निमसे, गोविंद आंधळे, भाऊसाहेब देशमाने, शांतीलाल सानप, नवनाथ वारे, उद्धव थोटे, महादेव झिरपे, सुरेश बडे, महादेव शिरसाठ, जितेंद्र जोशी,

गणेश अंधारे, भरत शिरसाठ, वाल्मिक कोहोक, रघुनाथ औटी आदि उपस्थित होते. योगेश पिंपळे यांनी आभार व्यक्त करतांना जय हिंद सैनिक सेवा फौंडेशनने साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने केलेल्या कार्याचा उल्लेख करुन नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचा जो सन्मान केला, त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment